Suicide, depression प्रतिकात्मक प्रतिमा (PC - Pixabay)

Uttar Pradesh Shocker: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बलिया जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 22 वर्षीय अग्निवीरने ड्युटीवर असताना आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर भारतीय हवाई दलात एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री उशिरा आग्रा येथील एअर फोर्स स्टेशनवर सेन्ट्री ड्युटीवर असताना त्याने  स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. (हेही वाचा- छत्तीसगडमध्ये दोन वेगवेगळ्या घटनेत विहीरीत पडून 9 जणांचा मृत्यू; विषारी वायुमुळे 5 जणांनी गमावला जीव)

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकांत कुमार चौधरी असं आत्महत्या करणाऱ्या अग्निवीराचे नाव आहे. तो 2022 मध्ये भारतीय हवाई दलात (IAF) सामील झाला होता. श्रीकांतचा नेमका मृत्यू कशामुळे झाला हे ठरवण्यासाठी चौकशी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. श्रीकांत यांच्यावर गुरुवारी संध्याकाळी त्यांच्या मूळ गावी, नारायणपूर येथे बिहार युनिटच्या भारतीय वायूसेनेच्या गार्ड ऑफ ऑनर देऊन अंत्यसंस्कार केले.

आत्महत्या केल्याच्या ठिकाणी कोणतीही सुसाईट नोट सापडली नाही. पोलिस या घटनेचा तपास घेत आहे. श्रीकांतचा मोठा भाऊ सिध्दांत बुधवारी संध्याकाळी कागदपत्रे देण्यासाठी आग्रा येथे आला होता. श्रीकांतच्या कुटुंबियांनी अद्याप तक्रार दाखल केलेली नाही. कुटुंबीयांनी शहागंज पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास आत्महत्येची चौकशी करु शकतो अशी माहिती पोलिस अधिकारी अमित कुमारी यांनी दिली.