Oxygen Shortage in Delhi: दिल्लीतील जयपूर गोल्डन रुग्णालयात ऑक्सिजनअभावी 20 रुग्णांचा मृत्यू
Oxygen Cylinders (Photo Credits: ANI)

Oxygen Shortage in Delhi: देशाची राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. परिणामी रूग्णालयात दाखल असलेल्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजनचीही प्रचंड कमतरता जाणवत आहे. दिल्लीच्या जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बत्रा आणि सर गंगा राम रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता आहे. (वाचा - Coronavirus Updates in India: भारतात कोरोनाचा कहर! गेल्या 24 तासात 3,46,786 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर 2,624 जणांचा बळी)

जयपूर गोल्डन हॉस्पिटलचे एमडी डॉ. डीके बलुजा यांनी असा दावा केला की, काल संध्याकाळी ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे सुमारे 20 अत्यंत गंभीर रुग्णांचा मृत्यू झाला. याशिवाय दिल्लीतील सरोज हॉस्पिटलमध्येही ऑक्सिजनची प्रचंड कमतरता भासत आहे. हॉस्पिटलच्या वतीने असे सांगितले जात होते की, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णालयात नवीन रुग्ण भरती करणे थांबवले असून काही रुग्णांना डिस्चार्ज देण्यात येत आहे. (वाचा - भारतात येणार मोठी आपत्ती? मे महिन्यात दररोज कोरोनामुळे होऊ शकतो 5000 जणांचा मृत्यू; अमेरिकन स्टडीमध्ये करण्यात आला दावा)

ऑक्सिजनच्या अभावाबद्दल बत्रा रुग्णालयाचे एमडी डॉ एससीएल गुप्ता म्हणाले की, आज सकाळी सात वाजता ऑक्सिजन संपला. दररोज आम्हाला सुमारे 7000 लीटर ऑक्सिजनची आवश्यकता आहे आणि आता 500 लीटर ऑक्सिजन पाठविला गेला आहे, जो काही काळ पुरेल. येथे 300 हून अधिक लोक आहेत, ज्यातील 48 आयसीयूमध्ये दाखल आहेत. त्यांची प्रकृती सध्या गंभीर आहे.

दरम्यान, बत्रा रुग्णालयात ऑक्सिजन टँकर आला आहे. बत्रा रुग्णालयाचे एमडी डॉ. एससीएल गुप्ता म्हणाले की, 500 किलो ऑक्सिजन एका ट्रकद्वारे रुग्णालयात दाखल केला जात आहे. जो ऑक्सिजन पुढील 1 तासासाठी पुरेसा असेल. रुग्णालयात 260 रुग्ण दाखल आहेत.

यापूर्वी बत्रा हॉस्पिटलमध्येही ऑक्सिजनची कमतरता होती. आता या रुग्णालयात काही काळापुरता ऑक्सिजन शिल्लक असल्याचे सांगितले जात आहे. हॉस्पिटलने त्वरित ऑक्सिजन देण्याची मागणी केली आहे. बत्रा रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. एससीएल गुप्ता म्हणाले की, बत्रा रुग्णालयातील ऑक्सिजनही संपण्याच्या मार्गावर आहे. दिल्लीतील जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्ये केवळ 45 मिनिटांचा ऑक्सिजन शिल्लक आहे. या रुग्णालयात 215 रुग्ण दाखल आहेत. राज्य सरकार व अन्य एजन्सींकडून ऑक्सिजन पुरवठा करण्याची मागणी रुग्णालयाचे एमडी डॉ. डीके बलुजा यांनी केली आहे.