Bihar Gangrape: लग्नावरून परतणाऱ्या 20 वर्षीय तरूणीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार; 4 जणांविरोधात गुन्हा दाखल, एकास अटक
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

लग्नावरून परतणाऱ्या एका 20 वर्षीय तरूणीचे अपहरण (Kidnapping) करून तिच्या सामूहिक बलात्कार (Gangrape) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना बिहराच्या (Bihar) सहरसा (Saharsa) येथे सोमवारी घडली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी एकास अटक करण्यात आली असून अन्य 3 आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरूणी आपल्या जवळच्या व्यक्तीच्या लग्नाला गेली होती. लग्न आटोपल्यानंतर पीडित तिच्या एका मित्रासह दुचाकीवरून घरी जात होती. यावेळी चार जणांनी त्यांची कार दुचाकीसमोर आणून त्यांचा मार्ग अडविला. दरम्यान, या चौघांनी तिच्या मित्राला मारहाण केली. तसेच पीडित तरूणीला कारमध्ये बसवून निर्जनस्थळी घेऊन गेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तसेच या घटनेची वाच्यता केल्यास याचे परिणाम वाईट होतील, अशीही धमकी तिला दिली. पीडिताने दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्यासोबत घडलेल्या सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर पीडिताच्या आई-वडिलांनी ताबडतोब जवळच्या ठाण्यात जाऊन आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्वरीत चौकशीला सुरुवात केली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून अन्य तिघांचा शोध घेतला जात आहे. हे देखील वाचा- Bihar: एका अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार; गरोदर राहिल्यानंतर झाला भांडाफोड, 60 वर्षीय व्यक्तीला अटक

सहरसाचे डीएसपी संतोष कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसा, या घटनेनंतर पोलिसांनी वेगवेगळी टीम बनवून चौघांच्या घरावर छापा मारला. दरम्यान, सहरसाच्या वार्ड 13 मध्ये राहणारा आरोपी उपेंद्र यादव उर्फ संतोष पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. तर, मोहम्मद हासिम, प्रभाष कुमार आणि विजय यादव हे तिन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.