प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: ANI)

देशात महिला अत्याचार आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्काराचे (Rape) सत्र थांबायला तयार नाही. देशातील विविध कोपऱ्यातून दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. अशातच बिहारच्या (Bihar) गया (Gaya) येथील एका घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका 60 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आरोपीने चाकूचा धाक दाखवत संबंधित तरूणीवर सलग 2 महीने लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पीडित तरूणी गरोदर राहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे.

पीडित तरूणी आणि आरोपी एकाच गावातील रहिवाशी आहेत. आरोपी गेल्या दोन महिन्यांपासून तिच्यावर लैंगिक अत्याचार असल्याचे पीडिताने तक्रारीत नमूद केले आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडिताला एका रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. तसेच पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. हे देखील वाचा- Chhattisgarh: तरुणाला थोबाडीत मारणाऱ्या जिल्हाधिकाऱ्याच्या विरोधात कारवाई, मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या निर्देशनावरुन पदावरुन हटवले

एएनआयचे ट्वीट-

बिहारच्या मुंगेर परिसरात काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली होती. एका व्यक्तीने19 वर्षीय गर्भवती महिलेवर बलात्कार केल्याची माहिती समोर आली होती. याप्रकरणी त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु, पीडित महिलेवर बलात्कार केल्यानंतर आरोपी फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.