जिल्हाधिकाऱ्याने तरुणाच्या थोबाडीत मारली (Photo Credits-Twitter)

Chhattisgarh: छत्तीसढ मधील सुरजपूर जिल्ह्यात लागू असलेल्या लॉकडाउन दरम्यान जिल्हाधिकारी रणबीर शर्मा यांनी एका तरुणाला थोबाडीत मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या संबंधित व्हिडिओ सुद्धा तुफान सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी जिल्हाधिकारी रणबीर शर्मा यांना सूरजपूर येथून तत्काळ हटवण्याचे निर्देशन दिल्याने त्यांना पदावरुन हटवण्यात आले आहे. मुख्यमंत्री कार्यालयानुसार, आयएएस गौरव कुमार सिंह यांना सध्या सूरजपूर जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी बनवण्यात आले आहे.

मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी ट्विट करत असे म्हटले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून सूरजपूर जिल्हाधिकारी रणबीर शर्मा यांनी एका तरुणासोबत गैरव्यवहार केल्याचे मला कळले आहे. ही अत्यंत दु:खद आणि निंदनीय घटनाा आहे. या प्रकारच्या वागणूकीला कोणत्याही प्रकारे सहन करुन घेतले जाणार नाही. जिल्हाधिकारी रणबीर शर्मा यांना तत्काळ पदावरुन हटवण्याचे निर्देशन दिले आहेत.

बघेल यांनी पुढे असे म्हटले की, कोणत्याही अधिकाऱ्याचा शासकीय आयुष्यात अशा प्रकारची वर्तवणूक स्विकार केली जाणार नाही. मी या घटनेमुळे अस्वस्थ झालो आहे. मी त्या तरुणासह त्याच्या परिवाराच्या प्रति खेद व्यक्त करतो.(गाझियाबाद: अपहरण केलेल्या मुलांची 5 ते 10 लाख रुपयांत विक्री, पोलिसांकडून 11 आरोपींना अटक)

Tweet:

दरम्यान, सुरजपूर जिल्ह्यात अमन मित्तल नावाच्या मुलावर कथित रुपात त्याने लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल केला. सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडिओ मास्क लावलेल्या एका तरुणाला पोलिसांनी जबरस्तीने थांबवले तेव्हा त्याने जिल्हाधिकाराऱ्यांना सुद्धा एक कागद आणि मोबाईलवर काही दाखवण्याचा त्याने प्रयत्न केला. यावेळी जिल्हाधिकाऱ्याने त्याचा फोन घेतला आणि जमिनीवर फेकून दिला. त्यानंतर तरुणाला जिल्हाधिकाऱ्याने कानाखाली सुद्धा मारले.

Tweet:

असे केल्यानंतर घटनास्थळी असलेल्या पोलिसांसह अधिकाऱ्यांनी तेथे धाव घेत त्याला दांडुक्याने मारले. व्हिडिओत जिल्हाधिकाऱ्याच्या द्वारे मारहाण करण्याचे आदेश दिले जात असल्याचे ऐकू येत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्याने माफी मागितली आणि नियमांचे पालन करण्यास ही सांगितले.