Ayodhya Verdict; निकालाच्यादिवशी 183 जणांना नजरकैदेत ठेवण्यात येणार
राम मंदिर-बाबरी मशीद वाद (Photo Credits: PTI)

Ayodhya Verdict; अयोध्या प्रकरणी ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईल, त्या दिवशी बसपाचे माजी आमदार योगेश वर्मांसह183 जणांना नजरकैदेत ठेवले जाणार आहे. योगेश वर्मा (Yogesh Verma) हे 2 एप्रिल 2018 मध्ये भारत बंद दरम्यान मीरतमध्ये हिंसाचार प्रकरणात आरोपी आहेत. अयोध्या प्रकरणात ज्या लोकांना अटक करण्यात आली होती त्यांना नजरकैदेत ठेवण्यात येणार आहे. तसेच चिथावणीखोर संदेश व्हायरल होऊ नये, म्हणून पोलिस आणि प्रशासनाकडून निकालाच्या दिवशी इंटरनेट सेवा बंद करण्याची शक्यता आहे.(हेही वाचा - राम मंदिर- बाबरी मशीद वादाचा काय होता इतिहास? जाणून घ्या सविस्तर)

2 एप्रिल 2018 मध्ये भारत बंद दरम्यान मीरतमध्ये हिंसाचार झाला होता. दरम्यान, दंगेखोरांनी कोट्यावधीचे नुकसान केले होते. या दंग्यात बसपाचे माजी आमदार योगेश वर्मांसह 183 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी शेकडो लोकांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे या दिवशी ज्या लोकांनी वातावरण प्रभावित केले होते त्या लोकांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, वाहतूक पोलिसांकडे 8 ड्रोन कॅमेरे देण्यात आले आहेत. त्या माध्यमातून सर्व घडामोडींवर नजर ठेवण्यात येणार आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर दररोज पोलिसांच्या 40 हून अधिक बैठका होणार आहेत.

हेही वाचा - Ayodhya Verdict; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरती सोशल मीडियावर व्यक्त होणे पडू शकते महागात

राम मंदिर-बाबरी मशिद खटल्याचा निकाल आता थोडेच दिवसात लागणार आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेला असा हा अयोध्येचा ऐतिहासिक खटला. या निकालाच्या पार्शवभूमीवरच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी सर्व पोलिसांच्या सुट्ट्या आणि रजा रद्द करण्यात आल्या आहेत. न्यायालयाच्या निकालानंतर नागरिकांनी सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. यासंदर्भात पावलं उचलण्यासाठीच सॊमवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक घेण्यात आली. या प्रकरणाशी निगडीत वादग्रस्त फोटो शेअर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. जर एखाद्याने असे केल्यास त्याच्याविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. अयोध्या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल सर्व भारतीयांनी पाळणे आणि त्याचा आदर करणे हे बंधनकारक आहे.