Girl commits suicide in Jamia Nagar (फोटो सौजन्य -X/ @lavelybakshi)

Student Commits Suicide in Delhi: राजधानी दिल्लीतून (Delhi) अत्यंत खळबळजनक घटना समोर येत आहे. दिल्लीत पुन्हा एका विद्यार्थिनीने मृत्यूला कवटाळले आहे. दिल्लीतील जामिया नगर (Jamia Nagar) भागात एका विद्यार्थिनीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या (Suicide) केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. विद्यार्थिनीच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. विद्यार्थिनीचे वय 17 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. आत्महत्येचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होत असून, त्यात पीडित विद्यार्थिनी इमारतीवरून रस्त्यावर पडताना दिसत आहे. मृत विद्यार्थिनीने जेईई परीक्षा दिली होती. मात्र, ती पास होऊ शकली नाही.

प्राप्त माहितीनुसार, विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणीने सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. घटनेनंतर तेथे नागरिकांची मोठी गर्दी झाली. स्थानिक लोकांनी विद्यार्थिनीला उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. (हेही वाचा - IIT Student Commits Suicide: IIT दिल्लीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या,पोलिसांकडून तपास सुरु)

व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती पाठीवर बॅग घेऊन उभा आहे. तो फोनवर कोणाशी तरी बोलत असतो. एक तरुण दुचाकीवरून जात आहे. बाईक पुढे जाताच एक मुलगी बिल्डिंगवरून वेगाने खाली पडते. ही घटना पाहिल्यानंतरही परिसरात लोकांची गर्दी जमते. (हेही वाचा -Boy Commits Suicide In Kalyan: कल्याणमधील 13 वर्षीय मुलाची गळफास लावून आत्महत्या; सुसाइड नोटमध्ये शिक्षक आणि वर्गमित्रांवर छळ केल्याचा आरोप)

JEE परीक्षा पास होऊ न शकल्याने दिल्लीतील 17 वर्षीय तरुणीची आत्महत्या, पहा व्हिडिओ - 

आत्महत्येपूर्वी विद्यार्थिनीने लिहून ठेवली सुसाईड नोट -

इमारतीवरून पडल्याने विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक लोकांनी सांगितले की, मृत तरुणीने काही दिवसांपूर्वी जेईईची परीक्षा दिली होती. परंतु, यात ती उत्तीर्ण होऊ शकली नाही. त्यानंतर विद्यार्थिनी खूपचं नाराज झाली होती. 'मला माफ करा, मी परीक्षा पास करू शकले नाही', असं विद्यार्थिनीने आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.