कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगासह भारताला (India) हादरून सोडले आहे. कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या भारतातही कोरोनाचे जाळे अधिक वेगाने पसरत असल्याचे चिन्ह दिसू लागले आहेत. भारतात गेल्या 24 तासांत एकूण 1 हजार 463 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर, कोरोनामुळे आज 60 लोकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याची माहिती दिली आहे. यामुळे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. यातच कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी संपूर्ण भारतात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र, कोरोना विषाणूचे जाळे पसरत चालत असल्यामुळे प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
जगभरात कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 30 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच 3 लाखांहून अधिक लोक कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात आतापर्यंत एकूण 28 हजार 380 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 886 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 6 हजार 362 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. हे देखील वाचा- मुंबई: कुर्ला विभागातील वाहतूक पोलीस हवालदाराचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू
एएनआयचे ट्वीट-
1463 new cases and 60 deaths reported in the last 24 hours. This is the highest death toll reported in 24 hours. India's total number of #COVID19 positive cases reported stands at 28,380 (including 6362 cured/migrated and 886 deaths) https://t.co/oOWsJHB1bw
— ANI (@ANI) April 27, 2020
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवरही कारवाई केली जात आहे.