आदित्य सरपोतदार (Aditya Sarpotdar) दिग्दर्शित 'झोंबिवली' (Zombivali) या चित्रपटाची सगळ्यांनाच उत्सुकता होती पण आता या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. अभिनेता ललित प्रभाकरने (Lalit Prabhakar) आणि अमेय वाघ (Amey Wagh) यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख इंस्टाग्राम (Instagram) वर पोस्ट शेअर करत सांगितली आहे. चित्रपटाचे पोस्टर शेअर करत दोघांनी लिहिले आहे ‘झोब्यांच्या टोळीला रोखण्याचा नाहीए कुणालाच क्लू! तयार रहा मित्रांनो ते तुमच्यासाठी येत आहेत. 'झोबिंवली' हा चित्रपट 4 फेब्रुवारी 2022 मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
झोंबिवली या चित्रपटात अभिनेता ललित प्रभाकर, अमेय वाघ, अभिनेत्री वैदेही परशुरामी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलं असून या चित्रपटाची कथा झोंबी या कल्पनेवर आधारित आहे. (हे ही वाचा Ajinkya Movie Trailer Release: 'अजिंक्य' चित्रपटचा दमदार ट्रेलर प्रदर्शित, भूषण प्रधान आणि प्रार्थना बेहरे मुख्य भूमिकेत.)
बॉलीवूड, हॉलिवूड मध्ये पाहिलेले झोंबी आता आपल्याला मराठी चित्रपटातही पाहायला मिळणार आहे, आदित्य सरपोतदारच्या दिग्दर्शनात हा चित्रपट पार पडला असून हा चित्रपट ३० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. पण करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.