अब्रुनुकसानीचा दावा केलेल्या तनुश्रीला राखीचा दणका, काय म्हणाली ते पाहा
राखी सावंत (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर मी टू मोहिमेच्या माध्यमातून गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. मात्र या आरोपाला विरोध करत राखी सावंत हिने या प्रकरणात उडी घेतली होती. तसेच मीडिला दिलेल्या एका मुलाखतीत तिने तनुश्री बद्दल अपशब्द वापरले होते. त्यामुळेच तनुश्रीने राखीवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकत 10 कोटींची मागणी केली आहे. त्यामुळे आता राखीने तनुश्रीने तिच्यावर केलेल्या 10 कोटींच्या मागणीला विरोध करत आपला मराठी दणका दाखवला आहे.

राखी सावंत हिने तनुश्री बद्दल मीडियाला दिलेल्या मुलाखतीत असे म्हणाली की, ती ड्रग्जच्या आहारी गेलेली स्री आहे. तसेच तनुश्रीने नाना पाटेकर आणि राज ठाकरे यांच्यावरही आरोप केले होते. मात्र आता ती माझ्या पाठी पडली असून माझ्याकडे 10 कोटींची मागणी करत आहे. तर तनुश्री हे सर्व नाटक पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी मिळवण्यासाठीच आहे असं राखीने सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

Part 6 #meetoo #rakhisawant reaction on #tanushree defamation case ..... @waahiidakhan

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

त्यामुळे तनुश्रीने माझ्यावर तिच्या अब्रुनुकसानीचा दावा केला असला तरीही मी तिच्यावर आता 50 कोटींचा दणका देणार असल्याचे राखीने तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओद्वारे सांगितले आहे.