राखी सावंतवर तनुश्री बरसली, केली 10 कोटींची मागणी

बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने काही दिवसांपूर्वी #MeToo या मोहिमे अंतर्गत नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तन केल्याचा आरोप लावला होता.

राखी सावंतवर तनुश्री बरसली, केली 10 कोटींची मागणी

बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने काही दिवसांपूर्वी #MeToo या मोहिमे अंतर्गत नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तन केल्याचा आरोप लावला होता. तसेच त्या नंतर बॉलिवूडमधील काही कलाकारांनी तिला साथ देत आपल्या सोबत झालेल्या गैरवर्तनाची व्यस्था सोशल मिडियावर उघडपणे मांडली होती. तर या मोहिमेत प्रामुख्याने राखी सावंत हिने तनुश्रीच्या या आरोपांना विरोध करत तिला मिडियासमोर तिला वाटेल तसे बोलली होती. त्यामुळेच आता तनुश्रीने राखी सावंत विरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा ठोकत 10 कोटी रुपयांची मागणी केली आहे.

राखी सावंत हिने नाना पाटेकर यांच्यावर लावलेल्या आरोपांना विरोध केला होता. तसेच एका प्रेस कॉन्फरन्समध्ये राखीने तनुश्री ही 'हॉर्न ओके प्लिज' या चित्रपटाच्या 'नथनी उतारु' या गाण्याचे शूट करित होती. मात्र त्यावेळी तनुश्री ही ड्रग्ज घेऊन तिच्या व्हॅनिटीमध्ये बेशुद्ध पडली असल्याचा खुलासा राखीने केला होता. त्यामुळे नाना पाटेकर आणि गणेश आचार्च यांच्या आग्रहाखातर हे गाण मला कराव लागले होते. त्यानंतर तातडीने मी सेटवर जाऊन त्या गाण्याचे अर्धवट राहिलेल शूट पूर्ण केले. तर प्रेस कॉन्फरन्समध्ये राखीने तनुश्रीसाठी अपशब्द सुद्धा वापरले होते.

त्यामुळेच आता तनुश्रीने राखी विरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. तर राखी सावंत तनुश्रीला 10 कोटी रुपये देणार का? याकडे आता सर्व प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Oct 22, 2018 02:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).