Valentine’s Day 2019 Celebration: वेलेंटाईन डे दिवशी सिद्धार्थ -मितालीने शेअर केला साखरपुड्याचा रोमॅन्टिक व्हिडिओ, प्रसाद - मंजिरीचं Twinning
Valentine’s Day Celebration (Photo Credits: Instagram)

Valentine’s Day 2019:  14 फेब्रुवारी हा दिवस जगभरात वेलेंटाईंन डे (Valentine’s Day) म्हणून साजरी करण्याची पद्धत आहे. संत व्हेलेंटाईन यांच्या बलिदानाच्या स्मृती प्रित्यर्थ प्रेमी युगुल 14 फेब्रुवारी या दिवशी जगात 'प्रेमाची' भावना पसरावी याकरिता प्रयत्न करतात. व्हेलेंटाईन डेच्या सेलिब्रेशनपूर्वी आठवडाभर प्रत्येक दिवस एका खास भावनेसाठी राखीव ठेवला जातो. ऐरवी ज्या कलाकारांचा रूपेरी पडद्यावरील अभिनय, रोमांस पाहून रसिक सुखावतात त्यांच्या खर्‍या आयुष्यातील प्रेमाच्या माणसांसोबत आज अनेकजण 'व्हेलेंटाईन डे' चं सेलिब्रेशन (Valentine’s Day Celebration) करत आहे. मिताली मयेकर - सिद्धार्थ चांदेकर (Mitali- Siddharth Chandekar) या जोडीपासून मृण्यमी देशपांडे (Mrunmayee Deshpande), प्रसाद ओक (Prasad Oak),शशांक केतकर (Shashank Ket kar)  यांनी व्हेलेटाइन डेचं सेलिब्रेशन सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करण्यात आलं आहे. Valentine’s Day 2019: म्हणून '14 फेब्रुवारी'ला साजरा केला जातो व्हेलेंटाईन डे!

मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर

सिद्धार्थ आणि मिताली यांचा नुकताच साखरपूडा झाला. त्यांनी या सोहळ्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. Siddharth Chandekar- Mitali Mayekar Engagement: मुंबईत पार पडला सिद्धार्थ-मितालीचा साखरपुडा, #SidMit च्या या खास सोहळ्यात मराठी सेलिब्रिटींची उपस्थिती

शशांक केतकर - प्रियंका ढवळे

शशांक आणि प्रियांकाने सोशल मीडियामध्ये एक खास डुएट गाणं शेअर केलं आहे.

 

View this post on Instagram

 

Happy Valentine's Day! ❤

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar) on

प्रसाद ओक - मंजिरी ओक

प्रसाद आणि मंजिरी ओक आणि सेम रंगाचा आणि शायरीचा शर्ट घालत ट्विनिंग केलं आहे.

 

View this post on Instagram

 

Happy Valentine's day @manjiri_oak

A post shared by Prasad Oak (@oakprasad) on

मृण्मयी देशपांडे - स्वप्नील राव

मृण्मयी देशपांडे आणि स्वप्नील राव या जोडीने त्यांचा घट्ट मिठीतला एक फोटो शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

❤️❤️❤️❤️

A post shared by Mrunmayee Deshpande (@mrunmayeedeshpande) on

मग यंदा तुमचा व्हेलेंटाईन डे प्लॅन ठरला आहे का? तुमच्या प्रियकर किंवा प्रेयसी सोबत तुम्ही आजचा दिवस साजरा करू शकत नसला तरीही जवळच्या व्यक्तींसोबत या दिवसाचं सेलिब्रेशन करू शकता. आणि प्रेम ही केवळ मनात ठेवायची गोष्ट नाही योग्य वेळी, योग्य व्यक्तीसमोर त्याची कबुली देणंही गरजेचे आहे.