Photo Credit- X

Reacts on Kissing Female Fans: अलिकडेच उदित नारायण यांचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये ते महिला चाहत्यांना किस ( KISS)करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर त्यांच्यावर बरीच टीका होत आहे. 'त्यांनी कमावलेले सर्व काही वाया घालवले', अशी टीका वापरकर्त्यांनी उदित नारायण (Udit Narayan)यांच्यावर केली. दरम्यान, उदित नारायण यांनी या सर्वांवर स्पष्टीकरण दिले आहे. 'आम्ही सुसंस्कृत लोक आहोत, मी माझ्या चाहत्यांना जबरदस्तीने किस करेन अशी माझी प्रतिमा नाहीये', असे उदित नारायण यांनी म्हटले.

उदित नारायण लाईव्ह शोमध्ये 'टिप टिप बरसा पानी' हे गाणे गात होते. गाणे गाता-गाता एक महिला चाहती सेल्फी घेण्यासाठी आली आणि फोटो काढून झाल्यावर उदित नारायण यांनी तिच्या गालावर किस केले. मग उदित नारायणने वळून तिच्या ओठांवर किस केले. अशीच क्रीया त्यांनी इतर काही महिला चाहत्यांसोबत केली. एका महिला चाहत्याच्या ओठांवर आणि दुसऱ्या एका चाहतीच्या गालावर त्यांनी किस केले. याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यावर आता वापरकर्त्यांनी बरीच टीका केली आहे.

उदित नारायण यांचे स्पष्टीकरण

या संपूर्ण घटनेवर, उदित नारायण यांनी 'एचटी सिटी'शी बोलताना म्हटले की, 'चाहते खूप वेडे असतात. मी तसा नाही, आमाही सुसंस्कृत लोक आहोत. काही लोक अशी कृतींद्वारे त्यांचे प्रेम व्यक्त करतात. या गोष्टीकडे फार लक्ष देण्याची गरज नाही?

'हा सगळा वेडेपणा आहे, इतके लक्ष देऊ नये'

उदित नारायण पुढे म्हणाले, 'गर्दीत बरेच लोक असतात. आमचे अंगरक्षक देखील उपस्थित आहेत. चाहत्यांना वाटते की त्यांना भेटण्याची संधी मिळावी. म्हणून काही जण हात मिळवण्यासाठी हात पुढे करतात, काही जण हातांचे चुंबन घेतात. हा सर्व तेव्हाच्या क्षणांचा वेडेपणा असतो. त्याकडे इतके लक्ष देऊ नये.'

'माझ्या कुटुंबाची प्रतिमा अशी आहे की सर्वांना वाद हवा आहे'

उदित नारायण म्हणाले की, या वादामागे आणखी काही हेतू असू शकतो. 'माझ्या कुटुंबाची प्रतिमा अशी आहे की सर्वांना वाद हवा असतो. आदित्य (मुलगा आदित्य नारायण) शांत राहतो आणि कोणत्याही वादात पडत नाही. अनेकांना असेच वाटत असेल. मी स्टेजवर गाणं गाणं वेडेपणाचं आहे. चाहते माझ्यावर प्रेम करतात, मला वाटतं त्यांना आनंदी राहू द्या. अन्यथा, आपण या प्रकारचे लोक नाही.

'माझी प्रतिमा अशी नाहीये की मी माझ्या चाहत्यांना जबरदस्तीने किस करतो'

त्यानंतर उदित नारायण यांनी एका महिला चाहत्याच्या ओठांवर चुंबन घेण्याच्या घटनेवर म्हटले की, 'मी बॉलिवूडमध्ये ४६ वर्षांपासून आहे, माझी प्रतिमा अशी नाही की मी माझ्या चाहत्यांना जबरदस्तीने चुंबन घेतो. खरं तर, जेव्हा मी माझे चाहते माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करताना पाहतो तेव्हा मी हात जोडतो. जेव्हा मी स्टेजवर असतो तेव्हा आजचा हा क्षण परत येईल की नाही याचा विचार करून मी डोके टेकवतो.