क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर युवराज सिंह चे छोट्या पडद्यावर पदार्पण? 'या' दोन मोठ्या शोसाठी झाली विचारणा
Yuvraj Singh (Photo Credits: Getty Images)

भारतीय संघाचा ऑल राउंडर खेळाडू युवराज सिंह (Yuvraj Singh) याने अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. या बातमीने त्याच्या चाहत्यांना फार मोठे धक्का बसला आहे. स्वतः युवराज सिंह सोबतच त्याच्या चाहत्यांना आता पुढे काय? असा प्रश्न पडला होता. मात्र आता माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार युवराज लवकरच छोट्या पडद्याच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येऊ शकतो. क्रिकेटच्या मैदानावर आपली कामगिरी सिद्ध केल्यानंतर आता टीव्हीवर युवराज आपला जलवा दाखवू शकतो. मात्र याबाबत अजूनतरी युवराजने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही.

मुंबई मिररच्या वृत्तानुसार, रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) 'खतरों के खिलाड़ी' या शोच्या 10 व्या सीझनचे (Khatron Ke Khiladi 10) शुटींग लवकरच सुरु होईल. यावेळी हा सीझन बुल्गारिया इथे शूट केला जाणार आहे. तर कलर्स वाहिनीने या शोमध्ये भाग घेण्यासाठी युवराज सिंहला विचारणा केली आहे. यासोबतच सलमान खान (Salman Khan) चा लोकप्रिय टीव्ही शो 'बिग बॉस सीझन 13' (Bigg Boss Season 13) साठीही युवजर सिंहला अॅप्रोच केले गेले आहे. याआधी क्रिकेट विश्वातील श्रीसंथ या शोमध्ये सहभागी झाला होता. या दोन्ही शो बाबत युवराज सिंह काय निर्णय घेईल ते लवरकरच समजेल. (हेही वाचा: युवराज सिंह पुन्हा पडणार षटकारांचा पाऊस, जीएल टी-20 टोरोंटो नॅशनलसाठी खेळण्यास सज्ज)

हे दोन्ही शो कलर्सचे असल्याने दोन्हीपैकी एका शोसाठी तरी युवराजचे मन वळवण्याचा प्रयत्न शोच्या निर्मात्यांकडून केला जात आहे. दरम्यान, याआधी अनेकदा युवराजला टीव्हीवरील विविध शोसाठी विचारणा झाली आहे. मात्र क्रिकेटमध्ये तो व्यस्त असल्याने ते घडू शकले नाही. आता 10 जून रोजी त्याने क्रिकेटमधून सन्यास घेतल्यानंतर छोट्या पडद्यावर त्याची एन्ट्री होण्याच्या शक्यता वाढल्या आहेत.