दीपिका सिंह (Photo Credits: Instagram)

चक्रीवादळ तौक्तेने मुंबई, गुजरातसह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात विनाश केला आहे. मुसळधार पावसामुळे आणि जोराच्या वाऱ्यामुळे अनेक झाडे कोसळली असून काही ठिकाणी घरांचे नुकसान झाले आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लोकांना घरामध्येचं राहण्याचे आवाहन केले आहे. या कठीण आणि आव्हानात्मक काळात काही लोकांनी या आपत्तीला एका संधीमध्ये रुपांतरीत केलं असून त्यास सकारात्मकतेने घेत त्याचा आनंद घेतला आहे.

टीव्ही अभिनेत्री दीपिका सिंहने सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. यात ती चक्रीवादळामुळे कोसळलेल्या झाडांमध्ये डान्स करताना तसेच पावसाचा आनंद घेताना दिसून येत आहे. या अभिनेत्रीने तिचे मुंबईतील छायाचित्रे चित्रे इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहेत. ज्यात 'दिया और बाती हम' अभिनेत्रीचा सुंदर अंदाज पाहायला मिळाला आहे. (वाचा -The Family Man 2 Trailer: मनोज वाजपेयी च्या बहुप्रतिक्षित वेब सिरिज 'द फॅमिली मॅन 2' चा ट्रेलर रिलीज, पहा व्हिडिओ)

आपले फोटोशूट पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "तुम्ही वादळ शांत करू शकत नाहीत, म्हणून प्रयत्न थांबवा. तुम्ही स्वत: ला शांत करा आणि निसर्गाचा आनंद लुटा, कारण हे वादळही संपुष्टात येईल."

दीपिकाने एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना तिने म्हटलं आहे की, "जीवनाचा अर्थ वादळ थांबण्याची वाट पाहत बसण्याचा नाही, तर पावसात नाचण्याचा आहे." न्यूज 18 वृत्तानुसार, या वादळात 13 जणांनी आपला जीव गमावला आहे. सोशल मीडियावरही अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. ज्यात मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाजवळ समुद्राच्या जोरदार लाटा पाहायला मिळाल्या.