![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2021/05/24-The-Family-Man-Season-2-380x214.jpg)
The Family Man 2 Trailer: 'द फॅमिली मॅन' सिरिजची प्रतीक्षा आता संपली आहे. कारण अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने या वेब सिरिजचा ट्रेलर प्रसिद्ध केला असून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. 'द फॅमिली मॅन 2' 11 जून रोजी नव्हे तर 4 जून 2021 रोजी प्रदर्शित होईल अशी अधिकृतपणे घोषणा केली आहे. यापूर्वी हा ट्रेलर आज दुपारी 1 वाजता रिलीज होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण अॅमेझॉन प्राइमने सकाळी 9 वाजता ट्रेलर रिलीज करून रसिकांना आनंदित केले आहे. 2 मिनिट 49 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये तुम्हाला घर आणि नोकरी दरम्यान श्रीकांतचे आयुष्य पुन्हा पहायला मिळेल. जे 'द फॅमिली मॅन' च्या पहिल्या भागात होते. पण यावेळी त्यांचा सामना नव्या सामर्थ्यवान आणि अधिक क्रूर शत्रूशी होणार आहे. ही भूमिका सामन्था अकिनेनी यांनी साकारली आहे. ट्रेलरमध्ये सामन्था मिशनच्या मागे लागलेल्या अतिरेकी संघटनेचा भाग असल्याचे दिसते. (वाचा - Nawazuddin Siddiqui Birthday: नवाजुद्दीन सिद्दीकी च्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या अभिनेत्याचे बॉलिवूड करिअर आणि संघर्ष)
ट्रेलरची सुरुवात श्रीकांत म्हणजेचं मनोज वाजपेयी आणि सुचित्रा अर्थात प्रियामणिपासून झाली आहे. जिथे दोघे ऑफिसमध्ये बसले आहेत आणि श्रीकांत आपली नोकरी बदलीची चर्चा करत आहे. यानंतर श्रीकांत एका खासगी कंपनीत काम करण्यास सुरवात करतो आणि 9 ते 5 आयुष्य जगू लागतो. पण जासूस व एजंट म्हणून देश वाचविण्याची हौस अजूनही त्याच्यात कायम आहे. त्याला अजूनही देशाचे रक्षण करायचे आहे. म्हणून नोकरी करत असताना तो त्याचा मित्र जे.के. म्हणजे शरब हाश्मीला मिशनबद्दल विचारतो. ज्यानंतर गोष्टी बदलताना दिसतात.
'द फॅमिली मॅन' चा दुसरा भाग 9 भागात रिलीज होईल. श्रीकांत पुन्हा एकदा मध्यमवर्गीय फॅमिली मॅन आणि वर्ल्ड क्लास डिटेक्टिव्ह या त्याच्या दुहेरी व्यक्तिरेखेच्या दरम्यान झगडताना दिसला आहे. पण या सर्वांच्या मधे बरेच ट्विस्ट्स आणि टर्न्स असतील जे आपणास मालिका रिलीज झाल्यानंतरच कळतील. तोपर्यंत ट्रेलर पहा.
साऊथ फॅमिली सुपरस्टार समांथा अक्किनेनी 'द फॅमिली मॅन 2' मध्ये डिजिटल डेब्यू केला आहे. त्यांच्याशिवाय मनोज वाजपेयी, प्रियामणि, शरिब हाश्मी, सीमा विश्वास, दर्शन कुमार, शरद केळकर, सनी हिंदुजा, श्रेया धनवंतरी, शहाब अली, वेदांत सिन्हा, मेहक ठाकूर हेदेखील या सिरिजमध्ये दिसणार आहेत.