Nawazuddin Siddiqui Birthday: नवाजुद्दीन सिद्दीकी च्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या अभिनेत्याचे बॉलिवूड करिअर आणि संघर्ष
Happy Birthday Nawazuddin Siddiqui (PC - File Image)

Nawazuddin Siddiqui Birthday: नवाजुद्दीन सिद्दीकीने आतापर्यंत बॉलिवूडमधील बर्‍याच चित्रपटांमध्ये आपल्या वेगळ्या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याचे चाहते केवळ भारतातचं नव्हे तर जगभरात आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकी यांचा जन्म 19 मे 1974 रोजी उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील बुढाणा या गावी झाला. 1996 मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी आपले घर सोडून दिल्ली येथे आला आणि येथे येऊन त्याने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे शिक्षण पूर्ण केले. अभिनयाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मुंबईत जाण्याचा निर्णय घेतला. चित्रपटांमधील छोट्या भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला खूप संघर्ष करावा लागला. तो 1999 मध्ये पहिल्यांदा आमिर खानच्या चित्रपट सरफरोशमध्ये दिसला होता. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी यांचे काही मिनिटांचे पात्र होते.

यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकी बर्‍याच चित्रपटांमध्ये छोट्या छोट्या भूमिकांमध्ये दिसला, पण तोपर्यंत त्याला अपेक्षित स्थान मिळालं नाही. 2012 मध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक अनुरोग कश्यप यांच्या 'गँग्स ऑफ वासेपुर' या चित्रपटाने दिग्गज अभिनेत्याच्या नशिबात बदल झाला. या चित्रपटात त्याने फैजल खानची भूमिका साकारली. आजही फैजलची भूमिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. (वाचा - Kangana Ranaut Tests Negative for COVID-19: कंगना रनौत ची कोरोना चाचणी निगेटिव्ह; म्हणाली, व्हायरसला कसं पराभूत करायचं ते मी नाही सांगणार)

'गँग्स ऑफ वासेपुर' चित्रपटानंतर नवाजुद्दीन सिद्दीकीने पुन्हा मागे वळून पाहिले नाही. या चित्रपटानंतर त्याने बदलापूर, मांझी द माउंटन, द लंच बॉक्स, रमण राघव 2, रईस, मंटो आणि ठाकरे यासारख्या अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटविला आहे. केवळ चित्रपटांमध्येचं नव्हे तर नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी डिजिटल व्यासपीठावरही आपल्या अभिनयाचा ठसा उमठवला आहे.

'सेक्रेड गेम्स' या वेब सिरीजमुळे नवाजुद्दीन सिद्दीकी यांचे व्यक्तिमत्व अभिनयाच्या जगात आणखी दृढ झाले. 2018 मध्ये आलेल्या 'सेक्रेड गेम्स' ने केवळ भारतातचं नव्हे तर संपूर्ण जगभर प्रसिद्धी मिळवली. वेब सीरिजमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीची व्यक्तिरेखा गणेश गायतोंडेचे लोक आजही कौतुक करतात. 'सेक्रेड गेम्स' शिवाय नवाजुद्दीन सिद्दीकीने बर्‍याच वेब सीरिजमध्ये काम केले आहे.