Kangana Ranaut Tests Negative for COVID-19: कंगना रनौत ची कोरोना चाचणी निगेटिव्ह; म्हणाली, व्हायरसला कसं पराभूत करायचं ते मी नाही सांगणार
Kangana Ranaut (Photo Credit: Twitter)

Kangana Ranaut Tests Negative for COVID-19: अभिनेत्री कंगना रनौतची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. यासंदर्भात तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून माहिती दिली आहे. कंगना आता कोरोना विषाणूच्या संसर्गापासून मुक्त झाली आहे. 8 मे रोजी कंगनाला कोरोना संसर्ग झाला होता. त्यानंतर तिने स्वत: ला होम क्वारंटाईन केलं होतं.

इन्स्टाग्रामवर ही माहिती सामायिक करताना अभिनेत्रीने लिहिले, "आपणा सर्वांच्या प्रेम व शुभेच्छांमुळे कोरोना संक्रमणातून मुक्त झाले आहे. मला विषाणूचा कसा पराभव करायचा याबद्दल बरेच काही सांगायचे आहे. परंतु कोविड फॅन क्लबला न दुखावण्यास सांगितलं गेले आहे. होय, जर आपण विषाणूबद्दल काही अनादर दाखविला तर काही लोक खरोखरच दुखावले आहेत. बरं, तुमच्या प्रेम आणि शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद. " (वाचा - Chennai: अभिनेते रजनीकांत यांची कोविड रिलिफ फंडासाठी 50 लाख रुपयांची मदत)

नियमांचे उल्लंघन केल्याचे सांगत कंगनाचे ट्विटर अकाउंट या महिन्याच्या सुरूवातीस सोशल मीडिया साइटने हटवले होते. त्यानंतर अभिनेत्री इंस्टाग्रामवर सक्रिय आहे. तथापि, कोविडचे वर्णन किरकोळ फ्लू असल्याचं म्हटल्याने कंगनाचे अकाऊंट काढून टाकण्यात आले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

Kangana Ranaut Instagram story (PC - Instagram)

देशातील बहुतेक ज्वलंत राजकीय प्रश्नांवर कंगना रनौत भाष्य करत असते. यासाठी ती सोशल मीडियाची मदत घेते. ट्विटरद्वारे कंगनाचे खाते हटवल्यानंतर ती सध्या इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह आहे. तेथे ती आपले मत मांडत असते. सध्या कंगना जेरुसलेमच्या मुद्दय़ावर इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संबंधावर भाष्य करत आहे.