Dheeraj Dhoopar & Vinny Arora: धीरज धूपर आणि विनी अरोरा यांनी चाहत्यांना दिली गुड न्यूज; विनीने दिला गोंडस मुलाला जन्म
Dheeraj Dhoopar & Vinny Arora (PC - Instagram)

Dheeraj Dhoopar & Vinny Arora: टीव्ही अभिनेता धीरज धूपर (Dheeraj Dhoopar) ची पत्नी आणि अभिनेत्री विनी अरोरा (Vinny Arora) हिने चाहत्यांना खुशखबर दिली आहे. धीरज धूपर आणि विनी अरोरा यांनी स्वत: त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवर ही माहिती दिली आहे. धीरज धूपर आणि विनी अरोरा यांनी एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये सांगितले की, त्यांच्या घरी गोंडस मुलाने जन्म घेतला आहे. धीरज आणि विनीची पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहते तसेच सेलिब्रिटीही त्यांचे अभिनंदन करत आहेत.

धीरज धूपर आणि विनी अरोरा यांनी या पोस्टमध्ये मुलांची थीम असलेले एक पोस्टर शेअर केले आहे. ज्यावर लिहिले आहे की, 'आम्ही खूप आनंदी आहोत, आमच्या घरी आमच्या मुलाचा जन्म झाला आहे.' त्याखाली 10 ऑगस्टची तारीख आणि विनी आणि धीरज यांची नावे आहेत. याशिवाय या पोस्टमध्ये विनी आणि धीरजचा फोटो आहेत. (हेही वाचा - Titliyaan Part 2 Official Trailer: तितलियां पार्ट 2 बेब सीरीजचा अधिकृत ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला, 29th July रोजी होणार प्रदर्शित)

विनी आणि धीरजची ही पोस्ट अनेक सोशल मीडिया यूजर्संनी लाईक केली आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहे. या व्यतिरिक्त टीना दत्ता, अमित खन्ना, कनिका मान, रिद्धिमा पंडित, दिशांक अरोरा, विकास, सुप्रिया शुक्ला, अदा खान, शायनी दोशी, रिझवान, रूही, धामी दृष्टी, सुमेर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी विनी आणि धीरजचे अभिनंदन केले आहे. यासोबतच धीरज आणि विनीच्या अनेक फॅन पेजेसवर त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dheeraj Dhoopar (@dheerajdhoopar)

धीरज आणि विनी यांचे 2016 मध्ये लग्न झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, धीरज धूपर आणि विनी अरोरा यांची 2009 मध्ये भेट झाली होती. "माता-पिता के चरणों में स्वर्ग" या मालिकेदरम्यान दोघांची मैत्री झाली. त्यानंतर दोघेही एकमेकांना डेट करू लागले. जवळपास 6 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2016 मध्ये लग्नानंतर आता या जोडप्याने चाहत्यांना खुशखबर दिली आहे.