Exclusive: तुझ्यात जीव रंगला एक्सिटच्या अफवा; शोला मिळणार नवा टाइम स्लॉट
Tuzhyat Jeev Rangala (Photo: File Image)

राणा आणि अंजलीची लव्ह स्टोरी लवकरच एक्सिट घेणार असल्याच्या बातम्या सर्वत्र फिरत आहेत. परंतु चॅनेलमधील काही खास सूत्रांनी लेटेस्टली मराठीशी एक्सकॅलुसिव्ह बातचीत करत असताना या फक्त अफवा असल्याचे सांगितले आहे.

'लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू' या नव्या मालिकेचे प्रोमो सध्या झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर प्रदर्शित होत आहेत. तुझ्यात जीव रंगला (Tuzhyat Jeev Rangala) मालिकेचा टाइम स्लॉट या नव्या मालिकेला देण्यात आला आहे. त्यामुळे राणा आणि अंजलीच्या फॅन्समध्ये शो लवकरच एक्सिट घेणार अशी चर्चा सोशल मीडियावर रंगताना  दिसली. तसेच अनेक माध्यमांनी शो लवकरच संपणार असल्याचे वृत्त दिले आहे.

परंतु चॅनेलकडून सांगण्यात आलं आहे की, "आम्ही प्राईम टाइमची वेळ वाढवत आहोत त्यामुळे काही शोजची वेळापत्रकं बदलतील. कोणताही शो एक्सिट घेणार नाही."

तसेच BARC ने प्रदर्शित केलेल्या नव्या यादीनुसार तुझ्यात जीव रंगला हा मराठी टीव्ही क्षेत्रातील सर्वात जास्त टीआरपी असणारा शो आहे.