'तुझ्यात जीव रंगला' मालिकेमधील राणादा चा भाऊ सूरज अडकला विवाह बंधनात, फिटनेस ट्रेनर शी केले लग्न
Raj Hanchnale Wedding (Photo Credits: Instagram)

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला' मधील राणादा छोटा भाऊ सूरज म्हणजेच राज हंचनाळे याने नुकतेच आपल्या सोशल अकाउंटवरून आपल्या लग्नाचे फोटो अपलोड करुन चाहत्यांना सुखद धक्का दिला. ही मुलगी एक फिटनेस ट्रेनर असून 6 वर्षांपासून ती रिलेशनशिप होते. त्यांचे हे फोटो पाहून राजच्या चाहत्यांना विशेषत: तरुणींना आश्चर्याचा धक्का बसला. मूळचा कोल्हापूरचा असलेल्या राजने हरयाणाची मुलीसोबत लग्न केले असून त्यांच्या 6 वर्षांच्या गोड नात्याची एक नवी सुरुवात केली आहे.

तुझ्यात जीव रंगला या झी मराठी वाहिनीवरील राणादा जितका लोकप्रिय झाला तितकाच त्याचा छोटा भाऊ सूरज देखील. राज ने साकारलेली दारूड्या सूरजशी भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली. 8 डिसेंबर 2019 ला सूरजने मनीषा उर्फ मॉली डेस्वाल हिच्याशी लग्न केले. त्याने सोशल मिडियावर आपल्या लग्नाचे फोटो शेअर केल्यानंतर अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी त्याच्या या गोड आठवणींना शुभेच्छा दिल्या.

 

View this post on Instagram

 

Grow old along with me! The best is yet to be. #RajKiMolly #2states #maratha #jatni #maharashtra #harayana #love #friends

A post shared by Raaj (@raj_hanchanale) on

हेदेखील वाचा- 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेमधील मधील 'युवराज' आहे या प्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा, 'फॉरेनची पाटलीण' या चित्रपटात केली होती महत्त्वाची भूमिका

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

#rajkimolly

A post shared by Molly (@happpy__molly) on

दोस्तीचं प्रेम २०१३” आणि ” लग्नाचं प्रेम २०१९” असे कॅप्शन देत त्याने आपल्या लग्नाचे फोटो शेअर करून एक सुखद धक्का दिला आहे.

मॉली ही मूळची हरियाणाची परंतु कामानिमित्त ती मुंबईत वास्तव्यास आहे. मॉली ही फिटनेस ट्रेनर असून स्केचिंग आर्टिस्ट, प्रोफेशनल 2d अॅनिमेटर आहे. तिला फोटोग्राफीची देखील आवड आहे. गेल्या ६ वर्षांपासून ते दोघे एकमेकांना खूप चांगले ओळखतात. या ओळखीचे आणि मैत्रीचे रूपांतर आता नात्याच्या बंधनात नुकतेच अडकल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.