एकता कपूर यांची लोकप्रिय मालिका 'कसौटी जिंदगी की 2' (Kasautii Zindagii Kay 2) ही मालिका आणि त्यातील प्रेरणा आणि अनुराग बासू हे पात्र तुफान लोकप्रिय झाले. त्यानंतर या मालिकेचा पुढचा भाग 'कसौटी जिंदगी की 2' आला. ही मालिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या मालिकेतील अनुराग बासूची भूमिका साकारणारा अभिनेता पार्थ समथान (Parth Samthaan) याने एका मोठा निर्णय घेतला आहे. लोकप्रियाच्या शिखरावर असताना या अभिनेत्याने टेलिव्हिजन विश्वातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्याने ही माहिती दिली.
'वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम करुन मला आनंद झाला आहे. त्यामुळे आता मी टेलिव्हिजन विश्वापासून ब्रेक घेणार आहे. मला तेथे पुन्हा काम करण्याची इच्छा नाही' असे पार्थ ने टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाला.हेदेखील वाचा- 'कसौटी जिंदगी की' या मालिकेमधील अभिनेत्री एरिका फर्नांडिस घागरा न घालताच पोहोचली सेटवर; व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल (Watch Video)
View this post on Instagram
मिळालेल्या माहितीनुसार, पार्थ सध्या वेब सीरिजच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने ब्रेक घेणार असल्याचे म्हटले आहे.
'जेव्हा मी पहिला शो केला तेव्हा मी या इंडस्ट्रीमध्ये नवीन होतो. पण कसोटी जिंदगी की ही मालिका केल्यानंतर सगळे काही बदलले. माझे मित्र, परिवार, शेजारी सगळे मला ओळखू लागले आहेत' असेही पार्थने मुलाखतीत सांगितले.
पार्थने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. त्याने 'यह है आशिकी', प्यार तूने क्या किया, सावधान इंडिया अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण एकता कपूरच्या 'कसौटी जिंदगी की 2' या मालिकेतील अनुराग हे त्याचे पात्र विशेष गाजलं. या मालिकेने त्याला ओळख मिळवून दिली.