'कसौटी जिंदगी की' या मालिकेमधील अभिनेत्री एरिका फर्नांडिस घागरा न घालताच पोहोचली सेटवर; व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल (Watch Video)
Erica Fernandes (Photo Credits: Instagram)

स्टार प्लस वाहिनीवरील बालाजी टेलिफिल्मची लोकप्रिय मालिका 'कसौटी जिंदगी की 2'  (Kasauti Zindagi Ki 2) सध्या घराघरात पोहोचली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे कसौटी जिंदगी की या मालिकेचा पहिला पार्ट ज्याने कित्येक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. तीच प्रसिद्ध या पार्टला देखील मिळाली. मात्र सध्या ही मालिका एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आहे. या मालिकेच्या शूटिंग सेटवरील एक व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात या मालिकेतील मुख्य नायिका एरिका फर्नांडिस (Erica Fernandes) घागरा न घालताच शूटिंग सेटवर पोहोचली. या व्हिडिओने सोशल मिडियावर खळबळ उडाली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असेलेल्या या व्हिडीओमध्ये एरिका पूर्णपणे ट्रेडिशनल लुकमध्ये दिसत आहे. पण यातील खास गोष्ट अशी की यात ती घागरा घालणंच विसरुन गेली आहे. पाहा व्हिडिओ

हेदेखील वाचा- 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेमधील मधील 'युवराज' आहे या प्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा, 'फॉरेनची पाटलीण' या चित्रपटात केली होती महत्त्वाची भूमिका

झाले असे की एरिका जेव्हा तिच्या सीन साठी घागरा-चोलीच्या वेषात सेटवर यायचे होते. मात्र ती उत्साहाच्या भरात तेव्हा ती तिच्या चोली खाली घाग-याऐवजी जीन्स घालून आली. तिची ही अवस्था पाहून दिग्दर्शकाने तिला याची आठवण करुन दिली. आणि सेटवर सर्व टीमध्ये एकच हशा पिकला.

हा व्हिडीओ शेअर करताना एरिकानं लिहिलं, ‘यावेळी दिग्दर्शकाचा हुकूम.’ या व्हिडीओवर प्रेक्षक वेगवेगळ्या कमेंट करताना दिसत आहेत. काहींनी एरिका खूपच विनोदी असल्याचं म्हटलं आहे. तर काहीनी लिहिलं, मी हसून हसून मरेन. याशिवाय एरिकाच्या या व्हिडीओवर अनेक कलाकारांच्याही कमेंट पाहायला मिळत आहेत.