![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/10/FotoJet-8-1-380x214.jpg)
'डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ ही मालिका आपल्या कथानकातून बाबासाहेबांचा जीवनातील एक एक पैल उलगडत आहे. त्यांची शिक्षणासाठीची तळमळ आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे. तसेच बाबासाहेबांचं बालपणही आपल्याला मालिकेत पाहायला मिळतं. त्यातीलच एक प्रसंग म्हणजे चिमुकला भीवा तासनतास क्रिकेटच्या खेळात रमत असे. आता मात्र बाळासाहेब उच्च शिक्षण घेऊन परदेशातून परततात आणि पुन्हा एकदा बॅट हातात उचलतात.
हा प्रसंग चित्रित होत असताना मालिकेतील कलाकारांमध्ये खरोखरचा क्रिकेटचा सामना खेळण्यात आला. तसं बघितलं तर बाबासाहेबांची भूमिका साकारणाऱ्या सागर देशमुखलाही क्रिकेटची प्रचंड आवड आहे. आणि आता शूटिंगच्या निमित्ताने सागरला त्याची आवडही जपता येत असल्याचा आनंद त्याने व्यक्त केला.
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/10/FotoJet-9-1.jpg)
अक्कासाहेब पुन्हा येत आहेत प्रेक्षकांच्या भेटीला... पण नव्या रूपात (See Photos)
क्रिकेट विषयीच्या आठवणी सांगताना सागर म्हणतो, "मी कटारिया हायस्कूल पुणे ह्या शाळेचा विद्यार्थी. आमच्या शाळेत क्रिकेटची टीम खूप तगडी होती आणि लहानपणापासून मला क्रिकेट खेळायला खूप आवडायचं. शाळेच्या टीमकडून कधी फारशी खेळायची संधी मिळाली नाही, पण मग महाराणा प्रताप संघ, इंगळेज क्रिकेट क्लब ह्या संघांकडून मी खेळलो. पुण्याच्या मराठवाडा मित्रमंडळ ह्या कॉलेजमध्ये मी 11 वी आणि 12 वी केली तेव्हाही त्या संघाकडून खेळलो. पुण्याच्या एस पी कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज, आय एल् एस लॉ कॉलेज ह्या महाविद्यालयांच्या मैदानावर न जाणो कित्येक सामने मी खेळलो आहे."
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/10/FotoJet-10-1.jpg)
जेव्हा मालिकेच्या सेटवर हा प्रसंग शूट झाला तेव्हा बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष, टाळ्या, धावा काढणे असे जोशपूर्ण वातावरण सेटवर होते.