सोनी सब (Sony Sab) टीव्ही वरील तारक मेहता का उल्टा चश्मा (Tarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका मागील 12 वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर आणि टीआरपीच्या स्पर्धे राज्य करत आहे. काल म्हणजेच 28 जुलै रोजी मालिकेची 12 वर्ष पूर्ण झाल्याचे सेलिब्रेशन सुद्धा दाखवण्यात आले होते. मात्र आत या मालिकेशी संबंधित एक मोठी माहिती समोर येत आहे, मालिकेत तारक मेहता या पात्राची पत्नी साकारणाऱ्या नेहा मेहता (Neha Mehta) यांनी शो मधून एग्झिट घेतल्याची माहिती समोर येत आहे, अजून यावर मालिकेच्या निर्मात्यांकडून शिक्कामोर्तब झालेलं नाही मात्र तरीही लॉक डाऊन नंतर अजून पर्यंत नेहा मेहता या पुन्हा शूटिंगला आलेल्या नसल्याने चर्चांना उधाण आले आहे. नेहा मेहता या शो च्या सुरुवातीपासून अंजली मेहता या भूमिकेत दिसल्या होत्या.
स्पॉटबॉय वेबसाईटच्या माहितीनुसार, नेहाने निर्मात्यांना आपण शो सोडत असल्या बाबत कळवले आहे. जुलै 10 पासून शो च्या पुन्हा शूटिंग ला सुरुवात झाली आहे, तेव्हापासून तरी नेहा मेहता शूटिंग ला आलेल्या नाहीत. 22 जुलै पासून शो चे पुन्हा प्रक्षेपण सुरु झाले आहे. अंजली मेहता आणि तारक मेहता हे मालिकेतील एक महत्वाचे पात्र आहे, डाएट च्या मागे हात धुवून लागलेली अंजली हुशार पण तितकीच भावुक दाखवली आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा च्या जेठालालची इंस्टाग्राम वर एंट्री; अभिनेता दिलीप जोशी यांनी केली 'ही' पहिली पोस्ट
दरम्यान, या पूर्वी टप्पू चे पात्र साकारणाऱ्या भव्या गांधी याने शो सोडला होता, त्यानंतर प्रेगनन्सी मुले शो मधून बाहेर पडलेल्या दिशा वखाणी म्हणजेच दया भाभी सुद्धा अद्याप शो मध्ये परतलेल्या नाहीत, मध्यंतरी रोशनसिंह सोधी हे पात्र साकारणारा गुरुचरण सिंह शुद्ध अशो सोडत असल्याच्या चर्चा होत्या मात्र त्या चर्चांना स्वतः निर्माते आसित कुमार मोदी यांनी पूर्णविराम लावला होता. आता त्यापाठोपाठ नेहा मेहता सुद्धा शो सोडत असल्याचे समजत आहे.