बिग बॉस (Bigg Boss) या लोकप्रिय शो चा 14 वा सीझन लवकरच सुरु होणार आहे. तत्पूर्वी आता यंदाच्या बिग बॉस मध्ये कोण कोणते सेलिब्रिटी पाहायला मिळणार याची चर्चा सुरु झाली आहे. आतापर्यंत सोशल मीडियावर अनेक कलाकारांची नावे यंदाच्या बिग बॉस च्या संभाव्य स्पर्धकांच्या अंदाजात समोर आली आहेत. यातीलच एक नाव म्हणजे सब टीव्ही वरील प्रसिद्ध मालिका तारक मेहता का उल्टा चश्मा (Tarak Mehta Ka Oolta Chashmah) च्या बबिता जी म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta). ही मालिका मागील 12 वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे, अर्थात त्यामुळे बबिता जी आणि परिणामी मुनमुनची फॅन फॉलोईंग भन्नाट आहे, या चर्चांमुळे तिचे अनेक फॅन्स सोशल मीडियाच्या माध्यमातून मॅसेज करत तिला बॉग बॉस मध्ये जाण्याबाबत विचारणा करत होते. आता या सर्व चर्चांवर मुनमून ने इंस्टाग्राम वरून उत्तर दिले आहे.
मुनमुन दत्ता हिने इंस्टाग्राम स्टोरी मध्ये म्हंटले की, "बिग बॉस हा शो माझ्या आवडीचा आहे मात्र त्यात सहभागी होण्याचा माझा कोणताही मानस नाही, कृपया अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये" Bigg Boss 14: सप्टेंबरपासून सुरु होणार सलमान खानच्या ‘बिग बॉस’चा 14 वा सिझन; निया शर्मा, व्हिव्हियन डीसेना, अध्यायन सुमन होऊ शकतात यंदाच्या पर्वाचा हिस्सा
मुनमुन दत्ता इंस्टाग्राम पोस्ट
दरम्यान, यंदाचा बिग बॉस चा सीझन कोरोनाच्या संकटातही पार पडणार आहे. यासाठी एक नवी कॉन्सेप्ट घेऊन शो चे निर्माते येतील. यामध्ये लॉक डाऊन आणि सोशल डिस्टेंसिंग चे नियम सुद्धा पाळले जातील. तुर्तास तरी या शो बाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाललेली नाही.