गेली अडीच वर्षे प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेली आणि लवकरच सर्वांचा निरोप घेणारी झी मराठी वरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' (Swarajya Rakshak Sambhaji) ही मालिका आता अंतिम टप्प्यात आली आहे. या मालिकेतील काही भाग वगळण्यात यावे अशी शिवसेना नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी केली होती. यावर डॉ.अमोल कोल्हे (Dr.Amol Kolhe) यांनी काही भाग वगळले असल्याच्या बातम्या ऐकायला मिळत होत्या. मात्र यावर सर्व अफवा असून आपण कोणताही भाग वगळला नाही असे या मालिकेचे मुख्य कलाकार डॉ.अमोल कोल्हे यांनी सांगितले आहे. शिवाय अर्जुन खोतकर यांच्याशी माझे बोलणे झाले नसून आम्ही जबाबदारीने, नैतिकचे भान ठेवून योग्य ती भाग चित्रीत केले असल्याचे त्यांना सांगितले असल्याचे एका व्हिडिओद्वारे म्हटले आहे.
आपल्या ट्विटर अकाउंटवरुन अमोल कोल्हे यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. कुणाच्या सांगण्यावरुन काही बदल करण्याची आवश्यकता असे मला वाटत नाही, त्यामुळे कृपया चुकीची बातमी दिली जाऊ नये अशी विनंतीही त्यांनी केलीय.
पाहा डॉ. अमोल कोल्हे यांचे ट्विट:
स्वराज्यरक्षक संभाजी मालिका अडिच वर्षे सुरू असताना @JagdambCreation @zeemarathi वाहिनीने जबाबदारीने, नैतिक कर्तव्यभावनेने ही मालिका केलीय काळजी घेतली असल्यामुळे कुणाच्या सांगण्यावरून काही बदल करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही. कृपया चुकीची बातमी दिली जाऊ नये ही विनंती. pic.twitter.com/0Mvgbj63Ht
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) February 22, 2020
हेदेखील वाचा- 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील राजांवरील छळाचा भाग रद्द, डॉ. अमोल कोल्हे यांनी अर्जुन खोतकरांना दिली माहिती
तसेच मालिकेतील काय प्रसारित करावे आणि करु नये अधिकार पूर्णत: झी मराठी वाहिनीचा आहे असेही त्यांनी यावेळी म्हटले. स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका 25 सप्टेंबर 2017 पासून प्रदर्शित होत आहे. ही मालिका आता प्रत्येक घराघरात जाऊन पोहोचली आहे. प्रेक्षकांनी या मालिकेला भरभरून पसंती दिली आहे. फेब्रुवारी महिन्यातच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं कळत आहे.