Pavitra Rishta (Photo Credits: Twitter)

सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) जाण्याने तिच्या चाहत्यांना जितका धक्का बसला तितकाच त्याची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिला देखील. त्यामुळे त्याच्या निधनानंतर त्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी पवित्र रिश्ता (Pavitra Rishta) या मालिकेचा दुसरा भाग बनवला अशी अंकिता लोखंडे हिने या मालिकेची निर्माती एकता कपूर हिला विनंती केली होती अशी बातमी कानावर ऐकायला मिळत होती. मात्र आता सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे यांची झी टिव्हीवरील (zee TV) लोकप्रिय मालिका पवित्र रिश्ता पुन्हा एकदा झी टीव्हीवर पाहता येणार आहे. यासंबंधीचा माहिती अंकिताने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.

अंकिताने या मालिकेच्या प्रक्षेपणाचा व्हिडिओ पोस्ट करुन 'तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मानव (Manav) आणि अर्चना (Archana) यांचे निरागस, निर्मळ प्रेम अनुभवायला मिळणार आहे' असे लिहिले आहे. रोज संध्याकाळी 3 ते 6 च्या दरम्यान झी टीव्हीवर ही मालिका दाखवली जाईल.

हेदेखील वाचा- Pavitra Rishta Part 2: सुशांत सिंह राजपूत-अंकिता लोखंडे यांची लोकप्रिय मालिका 'पवित्र रिश्ता' चा दुसरा भाग बनवणार एकता कपूर?

2009 मध्ये सुरु झालेली ही मालिका ऑक्टोबर 2014 पर्यंत चालली. लोकांनी या मालिकेतीली मानव-अर्चना म्हणजेच सुशांत आणि अंकिताला अक्षरश: डोक्यावर घेतले होते. या मालिकेदरम्यान त्या दोघांच्या लव्हस्टोरीला सुरुवात देखील झाली. त्यानंतर अनेक वर्ष नात्यात होते. मात्र कालांतराने त्या दोघांचे ब्रेकअप झाले. त्यामुळे त्या जोडीला त्यांचे चाहतेही फास मिस करु लागले. त्यामुळे आता ही मालिका टीव्हीवर पुन्हा सुरु होणार असल्यामुळे सुशांतला आणि विशेषत: या जोडीला पसंत करणा-या चाहत्यांसाठी ही पर्वणीच म्हणावी लागेल.