अक्षया नाईक ने 'सुंदरा मनामध्ये भरली' मधील स्टंट लीलया कसा साकरला याच चाहत्यांना दिलं उत्तर; पहा तिचा BTS Training Video
Akshaya Naik | PC: Instagram

सध्या' सुंदरा मनामध्ये भरली' (Sundara Manamadhe Bharali) मालिकेमधून अभिनेत्री अक्षया नाईक (Akshaya Naik) घराघरात पोहचली आहे. 'बॉडीशेमिंग वर' बोलणारी ही मालिका सध्या लोकांच्या पसंतीला उतरली आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेत 'लतिका' (Latika) पात्र साकारणार्‍या अक्षया नाईकने स्टोरीची गरज म्हणून तिच्या साथीदाराला खांद्यावर उचलून घेण्याचा एक स्टंट केला होता. त्याचं कलाकारांमध्ये आणि रसिकांमध्येही खूप कौतुक झाले. दरम्यान याच स्टंट मागची मेहनत अक्षयाने एका BTS Training Video मधून लोकांसमोर ठेवली आहे.

अक्षया नाईकने इंस्टाग्रामवर तिचा सहकलाकार आणि पतीची भूमिका साकारणार्‍या समीर परांजपे ला खांद्यावर उचलून हॉस्पिटल मध्ये नेले. या सीन बद्दल रसिकांच्या मनातही खूप प्रश्न होते. अखेर त्याचा उलगडा करण्यासाठी अक्षयाने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये तिने मालिकेचे क्रिएटीव्ह प्रोड्युसर आणि Fight Master अवधूत पुरोहित यांच्याकडून खास ट्रेनिंग घेतलं. त्यानंतर दिलेला कमाल सिन शेअर करताना तिने पडद्यामागची मेहनत 'The Art and The Artist' या पोस्ट द्वारा शेअर केली आहे. (नक्की वाचा:  'स्वीटू' फेम अन्विता च्या या Body Positivity बद्दलच्या इंस्टा पोस्ट तुम्हांलाही स्वतःवर प्रेम करायला शिकवतील!).

अक्षया नाईक पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Naik (@akshayanaik12)

अक्षया ने कालच (12 जुलै) 26 वा वाढदिवस साजरा केला आहे. सध्या नाशिक मध्ये सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेचं शूटिंग सुरू आहे. अभि आणि लतिकाच्या नात्यामध्ये सध्या दुरावा आला आहे. त्यामुळे एका रंजक वळणावर येऊन ठेपलेली मालिका आता पुढे काय वळण घेणार याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.