मराठी टेलिव्हिजन मधून सध्या घराघरात पोहचलेली अन्विता फलटणकर (Anvita Phaltankar) हीचा आज 24 वा वाढदिवस आहे. झी मराठीच्या 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेत 'स्वीटू' (Sweetu) या पात्राद्वारा अन्विता आबालवृद्धांमध्ये लोकप्रिय झाली आहे. एका 'वजनदार' अभिनेत्रीने मालिकेत मूळ पात्र साकरत आतापर्यंत कलाकार आणि रसिकांच्याही डोक्यात असलेल्या मुख्य अभिनेत्रीच्या सार्या कल्पना मोडत 'बॉडी शेमिंग' आणि 'बॉडी पॉझिटीव्हिटी' वर भाष्य करत रसिकांचं मनोरंजन करण्यामध्ये 'येऊ कशी..' मालिका आणि अन्विता देखील यशस्वी झाली आहे. बिनधास्त पण तितकीच ताकदीची कलाकार म्हणून अन्विता हळूहळू रसिकांची मनं जिंकत असली तरीही तिने अनेकदा तिच्या बाह्य स्वरूपावरून होणार्या टीपण्णीचा अनेकदा उल्लेख केला आहे. पण रंग, रूप, उंची वरून टोचणार्या अनेकांना त्याच भाषेत उत्तरं देखील दिली आहे. तुमच्याही मनात अशा बाह्य रूपावरून टीका, टीपण्णी होत असल्याने निर्माण झालेल्या न्यूनगंडावर मात करण्यासाठी अन्विताची काही इंस्टाग्राम पोस्ट नक्की पहा म्हणजे तुम्ही देखील स्वतःवर प्रेम करायला शिकाल.
दरम्यान अन्विता येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतून टेलिव्हिजन वर पदार्पण करत असली तरीही तिने यापूर्वी गर्ल्स आणि टाईमपास या दोन मराठी सिनेमामधूनही रसिकांची मनं जिंकली होती. मूळची ठाण्याची अन्विता मुंबईच्या रूपारेल कॉलेज आणि नंतर पुणे युनिव्हर्सिटी मध्ये शिकली. नाटक, सिनेमा सोबतच नृत्य कलेतही अन्विता निपुण आहे. (नक्की वाचा: Vanita Kharat Nude Photo Shoot: मराठी अभिनेत्री वनिता खरातचं Body Positivity Movement साठी न्यूड फोटो शूट).
अन्विताची बॉडी पॉझिटीव्हिटी बद्दल काही इंस्टाग्राम पोस्ट
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
अन्विता फलटणकर सध्या टेलिव्हिजन क्षेत्रात स्वतःला चाचपून पाहत आहे. 'स्वीटू' या पात्रामुळे ती सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. सोशल मीडीयावर अन्विता अॅक्टिव्ह असते आणि सेटवरची धमाल मस्ती ती अनेकदा इंस्टा स्टोरीज, पोस्ट द्वारा शेअर करत असते. त्यामुळे रिअल लाईफ सोबत रील लाईफ मध्येही कळत नकळत तिच्या आयुष्यातील काही संघर्षाचे क्षण शेअर करता करता आज ती अनेकांना प्रेरणा देखील देत आहे.