Vanita Kharat Nude Photo Shoot: मराठी अभिनेत्री वनिता खरातचं Body Positivity Movement साठी न्यूड फोटो शूट
Vanita Kharat| Photo Credits: Instagram/ Vanita Kharat

प्रामुख्याने विनोदी भूमिकांमध्ये दिसणारी अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat) हीने 2021 च्या पहिल्याच दिवशी खास बोल्ड अंदाजामधील एक फोटो शेअर केला. बघता बघता आता सोशल मीडीयामध्ये त्याची चर्चा होण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान वनिताने केलेले न्यूड फोटोशूट हे एका स्तुत्य उपक्रमाचा भाग आहे. Body Positivity Movement चा संदेश देत या धर्तीवर एका कॅलेंडरसाठी हा फोटो आहे. प्रसिद्ध फोटोग्राफर तेजस नेरूरकर याने हे फोटो शूट केले आहे. सोशल मीडियामध्ये वनिताच्या चाहत्यांना तिचा हा बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफूल अंदाज आवडला आहे. अनेकांनी तिचं यासाठी अभिनंदन केले आहे.

वनिताने खास इंस्टाग्राम पोस्ट लिहित, 'मला माझ्या टॅलेंटवर अभिमान आहे. माझं पॅशन, माझा आत्मविश्वास.. मला माझ्या शरीराचा अभिमान आहे कारण मी मी आहे.' असं म्हणत अनेक 'बॉडीशेमिंग' करणार्‍यांना चोख उत्तर दिलं आहे. वनिताच्या या धाडसाचं अभिनेत्री सई ताम्हणकरनेही कौतुक करत खास इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. 'शनाया' फेम रसिका सुनील चा Sexy अंदाज सोशल मीडियात व्हायरल; फीटनेस फ्रीक्स देखील होतील थक्क (Photo).

वनिता  खरात इंस्टाग्राम पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by @vanitakharat19

वनिता  खरात सोनी मराठी वर एका कॉमेडी शो मध्ये स्पर्धक आहे. तर बॉलिवूड मध्ये तिनं शहीद कपूरच्या 'कबीर सिंग' चित्रपटात मोलकरीण पुष्पा ची भूमिका साकारली होती. विक्की वेलिंगकर मराठी सिनेमातही झळकली होती. विनिताचा अशाप्रकारे पहिल्यांदाच अंदाज पहायला मिळाल्याने अनेकांना तिला ओळखणं अशक्य होतं.