'शनाया' फेम रसिका सुनील चा Sexy अंदाज सोशल मीडियात व्हायरल; फीटनेस फ्रीक्स देखील होतील थक्क (Photo)
Rasika Sunil | Photo Credits: Instagram

शनाया फेम रसिका सुनील या मराठमोळ्या अभिनेत्रीने 2019 ला अलविदा म्हणत सुपर हॉट अंदाजात 2020 या नव्या वर्षाचं स्वागत केलं आहे. रसिकाने 31 डिसेंबरच्या रात्री खास बिकनी अंदाजातील फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत रसिकाने लिहलेली पोस्ट देखील तितकीच खास आहे. मागील वर्षभरात रसिकाने तिच्या शरीरावर मेहनत घेतली आहे. फीटनेस ट्रेनर शैलेश परूळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तिने शरीरावर मेहनत घेतल्याचं तिने म्हटलं आहे. दरम्यान 2020 चं स्वागत करण्यासाठी आता मी अधिक आत्मविश्वासू, बेधडक झाली असल्याच्या भावना तिने आपल्या पोस्टमध्ये लिहल्या आहेत. New Year Resolution for 2020: नवीन वर्षात हवे असेल निरोगी स्वास्थ्य तर 2020 च्या पहिल्या दिवशी हा संकल्प जरूर करा.

रसिकाने या पोस्टमध्येच सध्या तरी ती शिक्षण किंवा हॉलिवूडमध्ये संधीसाठी परदेशात जाणार नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांसाठी ही मोठी खूषखबर आहे. त्यामुळे सुपर हॉट बिकनी अंदाजातील रसिका सुनीलच्या फोटोसोबत ही बातमी तिच्या चाहत्यांसाठी डबल ट्रीट आहे. Sara Ali Khan चा Bikini Look होत आहे सोशल मीडियावर व्हायरल (See Photos)

रसिका सुनील हिचा सुपरहॉट बिकनी अंदाज

'माझ्या नवर्‍याची बायको' मालिकेतील 'शनाया' या भूमिकेने अभिनेत्री रसिका सुनिलचं आयुष्यचं बदलून गेलं. दरम्यान मध्यंतरी रसिकाने काही काळ अभिनयातून ब्रेक घेऊन अमेरिकेला शिक्षणासाठी गेली होती. मात्र आता आगामी वर्षात रसिका काही बोल्ड भुमिकांमधून दिसणार असल्याचे संकेत तिने वर्षाच्या पहिल्याच दिवशी रसिकांना दिले आहेत.