टीव्ही अभिनेता समीर शर्मा (Sameer Sharma) याने मालाड पश्चिम येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे आता खळबळ उडाली असून त्याने किचनच्या सिलिंगला लटकून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी आता इमारतीचे सेक्रेटरी दिनेश बुबना यांनी याबाबत अधिक माहिती देत असे म्हटले आहे की, समीर याच्या घरातून वास येत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी केली. त्यानंतर त्याच्या घरी जाऊन पाहिले असता त्याने आपले जीवन संपवल्याचे दिसून आले.
समीर याच्या घरातून वास येत असल्याने इमारतीच्या गार्ड त्याच्या येथे पोहचला. त्यावेळी किचनचा दरवाजा खुला असून समीर याने सिलिंकला लटकून आत्महत्या केल्याचे दिसून आले. समीर याच्या आत्महत्येप्रकरणी अपघाती मृत्यू म्हणून रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. समीरचा मृतदेह पाहता त्याने दोन दिवसांपूर्वीच आत्महत्या केल्याचा संशय मालाड पोलिसांनी व्यक्त केला आहे.(टीव्ही अभिनेता Sameer Sharma चे निधन, मुंबईतील राहत्या घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, आत्महत्या केल्याचा संशय)
His neighbours had complained that a foul smell was coming from his residence. When a guard went there, he saw that doors of the kitchen were open & he was hanging from the ceiling: Dinesh Bubna, Secretary of the housing society in Mumbai where TV actor Sameer Sharma was residing https://t.co/QAH4C9v6CD pic.twitter.com/rRR2dDUoCa
— ANI (@ANI) August 6, 2020
दरम्यान, समीर शर्मा याने 'ये रिश्ते है प्यार के', 'सास भी कभी बहु थी', 'कहानी घर-घर की' सारख्या मालिकांमध्ये काम केले होते. यापूर्वी अभिनेता सुशांत याने सुद्धा राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी अद्याप अधिक तपास केला जात असून यामध्ये आता CBI सुद्धा सामील होणार आहे.