Sameer Sharma (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येला 2 महिने होते ना होते तो छोट्या पडद्याला आणखी एक धक्का बसला आहे. हिंदी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता समीर शर्मा (Sameer Sharma)  याने मुंबईतील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या (Suicide) केल्याचे समोर आले आले आहे. समीरचा मृतदेह मुंबईच्या मालाड परिसरातील त्याच्या राहत्या घरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. समीरने 'ये रिश्तें हैं प्यार के' (Ye Rishte Hai Pyar Ke), 'क्योंकि सास भी कभी बहु थी' (Kyonki Saas Bhi Kabhi Bahu Thi), 'कहानी घर-घर की' यांसारख्या हिंदीतील लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. त्याच्या मृतदेहाशेजारी कोणतीही सुसाईड नोट मिळाली नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

समीरच्या पत्नीचे त्याच्याशी बोलणे झाले नाही म्हणून त्याच्या पत्नीने समीरच्या मित्राला त्याच्या घरी जाऊन पाहण्यास सांगितले. तेव्हा त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंह राजपूत याची हत्या झाली, भाजप खासदार नारायण राणे यांचा दावा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर शर्मा गेल्या काही दिवसांपासून मिडियाच्या नजरेस पडले नव्हते. जेव्हा त्याच्या घरातून दुर्गंधी येऊ लागली तेव्हा सोसायटीच्या वॉचमॅनने पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांना हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

असेही सांगण्यात येत आहे की, समीरचा मृत्यू दोन दिवसांपूर्वीच झाला असावा. मात्र याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसून पोलिस तपास करत आहेत.