Elvish Yadav Snake Venom Case: बिग बॉस OTT 2 चा विजेता YouTuber सिद्धार्थ यादव उर्फ एल्विश यादव (Elvish Yadav) च्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. ED ने YouTuber आणि इतर काही जणांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा (Money Laundering Case) गुन्हा दाखल केला आहे. मनी लॉन्ड्रिंगचा मुद्दा सापाच्या (Snake) विषाच्या पुरवठ्याशी संबंधित आहे. उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर (नोएडा) जिल्हा पोलिसांनी गेल्या महिन्यात एल्विश आणि इतरांविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआर आणि आरोपपत्राची दखल घेत केंद्रीय एजन्सीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) गुन्हा दाखल केला आहे.
ईडीची टीम एल्विश यादव आणि या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर लोकांची चौकशी करू शकते. हे मनी लॉन्ड्रिंगचे प्रकरण सापाचे विष पुरवण्याशी संबंधित आहे. आता हे संपूर्ण प्रकरण ईडीच्या तपासाच्या कक्षेत आले आहे. (हेही वाचा -Elvish Yadav Booked For Beating Up: बिग बॉस ओटीटी विजेता एल्विश यादववर गुन्हा दाखल; युट्युबरला केली होती मारहाण (Watch Video))
नोएडा पोलिसांनी 17 मार्च रोजी यूट्यूबर एल्विश यादवला अटक केली होती. पार्ट्यांमध्ये करमणुकीचे औषध म्हणून सापाच्या विषाचा वापर केल्याने पोलिसांनी एल्विशवर कारवाई केली होती. नोएडा पोलिसांनी युट्युबरवर नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायदा, वन्यजीव संरक्षण कायदा आणि भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. (हेही वाचा - Elvish Yadav Arrested: एल्विश यादवला 14 दिवसांची पोलीस कोठडी, सापाच्या विषाची तस्करी केल्याचा आरोप)
दरम्यान, पीपल फॉर ॲनिमल्स (पीएफए) या प्राण्यांच्या हक्कांच्या स्वयंसेवी संस्थेने गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर रोजी नोएडातील सेक्टर 49 पोलिस ठाण्यात एल्विश यादवसह सहा जणांविरुद्ध तक्रार दाखल केली होती.