देशावर घोंगावणाऱ्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. 21 दिवसांच्या या लॉकडाऊनच्या काळात विनाकारण घरातून बाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे घरात नुसतं किती वेळ बसून राहणार? काहीतरी विरंगुळा हवा. त्यामुळे लोकाग्रहास्तव रामायण, महाभारत यांसारख्या मालिका पुन्हा सुरु करण्यात आल्या. त्याचबरोबर दूरदर्शनवर इतर लोकप्रिय मालिकाही पुनः प्रसारित केल्या जाणार आहेत. त्यानंतर आता प्रायव्हेट टीव्ही चॅनेल्सने देखील जुन्या लोकप्रिय मालिका पुन्हा दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. साराभाई वर्सेस साराभाई आणि खिचडी या दोन कॉमेडी मालिकांचा आनंद प्रेक्षकांना पुन्हा घेता येणार आहे. (दूरदर्शन वर रसिकांच्या भेटीला पुन्हा येणार 'शक्तिमान', ' श्रीमान श्रीमती', 'चाणाक्य' सारख्या दर्जेदार मालिका; पहा या मालिकांच्या पुर्नप्रक्षेपणाच्या वेळा)
स्टार भारत ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याची माहिती दिली. हे कार्यक्रम सकाळी 10 वाजता पुन्हा प्रसारित केले जातील. याची माहिती देताना त्यांनी ट्विटरवर लिहिले की, "16 वर्षांनंतर पुन्हा इंद्रावन तुमच्या भेटीला येत आहे. पहा साराभाई वर्सेस साराभाई. 6 एप्रिल पासून सकाळी 10 वाजता केवळ स्टार भारत वर."
स्टार भारत ट्विट:
16 साल बाद, इंद्रवदन आ रहा है आप से मिलने फिर एक बार!
देखिए ''साराभाई Vs साराभाई'', 6 अप्रैल से, हर-रोज़ सुबह 10 बजे, सिर्फ़ STAR भारत पर!#KhichdiwithSarabhais pic.twitter.com/iGkpoUFxmO
— STAR भारत (@StarBharat) April 3, 2020
खिचडी या मालिकेची माहिती देताना केलेल्या ट्विटमध्ये लिहिले की, "18 वर्षांनंतर प्रफुल तुमच्या भेटीला येत आहे. पहा खिचडी. 6 एप्रिल सकाळी 11 वाजता फक्त स्टार भारत वर."
स्टार भारत ट्विट:
18 साल बाद, जयश्री और बाबूजी की नोक-झोक होंगी शुरू फिर एक बार!
देखिए 'खिचड़ी', 6 अप्रैल से, हर-रोज़ सुबह 11 बजे, सिर्फ़ STAR भारत पर!#KhichdiwithSarabhais pic.twitter.com/Gkt6tYCZRl
— STAR भारत (@StarBharat) April 4, 2020
मोगली पुन्हा येणार भेटायला ; 'द जंगल बुक'होतय सुरु,जाणून घ्या नवी वेळ: Watch Video
दूरदर्शनवर रामायण, महाभारत या शोज सह कॉमेडी शोजची रेलचेल आहे. लॉकडाऊन काळात लोकांच्या मनोरंजनासाठी 'श्रीमान श्रीमती', 'देख भाई देख', 'शक्तिमान', 'बुनियाद' आणि उपनिषद गंगा' यांसारख्या कार्यक्रमांचे पुनःप्रसारण केले जात आहे.