'या' मराठी अभिनेत्रीला ऑडिशनसाठी व्हायला सांगितले होते नग्न; वाचा तिने सांगितलेला धक्कादायक प्रसंग
Sonal Vengurlekar (Photo Credits: Instagram)

अनेकांसाठी ही सिनेसृष्टी म्हणजे एक स्वप्न नागरी असते. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे येतात आपलं नशीब अजमावायला. मग त्यातील अनेक नव्या कलाकारांना 'कास्टिंग काऊच'ला देखील सामोरे जावे लागते. कास्टिंग काऊचचा असाच एक प्रसंग घडलाय मराठी अभिनेत्री सोनल वेंगुर्लेकर हिच्या सोबत.

सोनलने आपलं महाविद्यालयीन शिक्षण संपवून अभिनय क्षेत्रात काम करायचे ठरवले. ती एका मालिकेच्या ऑडिशनसाठी गेली होती आणि तिथे तिची निवडसुद्धा झाली.

बॉम्बे टाइम्स या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सोनलने त्या नंतर घडलेला एक धक्कादायक प्रसंग सांगितला आहे. राजा बजाज याने सोनलला एका खोलीत बोलवून घेतले होते. आणि मद्यधुंद अवस्थेत तिच्याकडे एक डिमांड केली. त्याने सोनलला नग्न अवस्थेत समोर यायला सांगितले. इतकंच नव्हे तर तुला तांत्रिक विद्या शिकवेन असं म्हणत त्याने सोनलवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला असल्याचे नमूद केले आहे.

घाबरलेल्या सोनलने तिथून कसाबसा पळ काढला आणि तिच्या आईसोबत थेट पोलीस स्टेशन गाठले. परंतु पोलिसांनी घडल्या प्रकारची दखल न घेत राजावर भलताच आरोप दाखल केला, असं सोनल ने म्हटलं आहे.

See Photos: अभिनेत्री सुकन्या काळण हिने केले टॉपलेस फोटोशूट

सोनल हिने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं असून, ये रिश्ता क्या कहलाता है, दिल दोस्ती डान्स, शास्त्री सिस्टर्स या मालिकांमधील भूमिका तिच्या विशेष गाजल्या.