'सुपर डान्सर 4' ची शूटिंग पुन्हा सुरु करण्यापूर्वी Shilpa Shetty ने निर्मात्यांपुढे ठेवल्या 'या' अटी?
Shilpa Shetty (Image Credits: Instagram)

पॉर्नोग्राफी प्रकरणात शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) चे पती आणि बिजनेसमन राज कुंद्रा (Raj Kundra) अद्याप अटकेत आहे. राज कुंद्रा यांचे अश्लील फ्लिम निर्मिती प्रकरण समोर आल्यानंतर तब्बल महिनाभर शिल्पा शेट्टी अनेक अडचणींचा सामना करत मीडिया आणि शो पासून दूर होती. मात्र आता ती पुन्हा आयुष्य पूर्ववत करण्याच्या मार्गावर आहे. तिने सुपर डान्सर 4 (Super Dancer 4) च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. परंतु, मीडियापासून तिने दूर राहणेच पसंत केले आहे. दरम्यान, सुपर डान्सर 4 च्या सेटवर परतण्यासाठी तिने निर्मात्यांसमोर काही अटी ठेवल्याचे समोर येत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, शो मध्ये कोणताही वादग्रस्त प्रश्न उपस्थित होता कामा नये. झाल्यास ती त्याचे उत्तर देणार नाही. त्याचबरोबर खाजगी आयुष्याशी निगडीत गोष्टींवर थट्टा केलेली चालणार नाही, असे शिल्पा शेट्टी ने सुपर डान्सरच्या टीमशी बोलताना स्पष्ट केले. (Super Dancer 4 मध्ये झळकल्यानंतर शिल्पा शेट्टी हिने केली पहिली पोस्ट, पहा काय लिहिले कॅप्शन)

काही काळ शो पासून दूर असलेल्या शिल्पाला पुन्हा शो मध्ये आणण्याचा निर्मात्यांचा मानस होता. त्यामुळे त्यांनी शिल्पाच्या अटी मान्य करण्यास जराही विलंब केला नाही. त्यानंतर शिल्पा पुन्हा एकदा जज च्या रुपात शो मध्ये दिसत आहे. त्याचबरोबर शिल्पा शो मध्ये परतल्यानंतर तिचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर शिल्पा काहीशी भावूक झाली. तिने हात जोडून सर्वांना नमन केले. दरम्यान, सध्याचा काळ शिल्पासाठी अत्यंत कठीण आहे. त्यामुळे अनेकदा शिल्पा सोशल मीडिया पोस्टद्वारे आपल्या भावना व्यक्त करताना दिसते.