Super Dancer 4 मध्ये झळकल्यानंतर शिल्पा शेट्टी हिने केली पहिली पोस्ट, पहा काय लिहिले कॅप्शन
Shilpa Shetty (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचा संपूर्ण परिवार गेल्या कागी दिवसांपासून समस्येत सापडले आहेत. शिल्पा हिचे पती राज कुंद्रा याला अश्लील व्हिडिओ प्रकरणी तुरुंगाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ज्यामुळे अभिनेत्री आणि तिचा परिवार सध्या त्रासात आहेत. मात्र याच दरम्यान, शिल्पा शेट्ट हिने यातून पुढे जाण्याचा मार्ग काढला आहे. शिल्पा शेट्टी ही नुकतीच पुन्हा एकदा रिअॅलिटी शो 'सुपर डान्सर 4' (Super Dancer-4) मध्ये झळकली. तिला पाहून असे वाटते की, तिने आपले आयुष्य पुन्हा एकदा ट्रॅकवर आणण्याचे प्रयत्न करत आहेत. अशातच शिल्पा हिने सोशल मीडियात एक पोस्ट सुद्धा शेअर केली आहे. ज्यामध्ये शिल्पा हिला तिच्या चाहत्यांनी आत्मविश्वास आणि धीर देण्यास प्रयत्न करताना दिसून आले आहेत.

राज कुंद्रा यांचा प्रकरणापूर्वी शिल्पा सोशल मीडियात खुप अॅक्टिव्ह होती. शिल्पा सातत्याने आपले फोटो किंवा व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत होती. मात्र राज कुंद्राच्या प्रकरणानंतर ती खुपच कमी सोशल मीडियात अॅक्टिव्ह झाली. त्यानंतर आता परत ती सोशल मीडियात अॅक्टिव्ह झाली असून नुकतीच तिने एक पोस्ट ही शेअर केला आहे. त्या पोस्ट खाली तिने एक कॅप्शन सुद्धा लिहिले आहे. या कॅप्शनमध्ये तिने असे म्हटले आहे की, ''There is no force more powerful than a woman determined to rise.''(Ganpath Teaser: टायगर श्रॉफचा आगामी गणपथ चित्रपटाचा टीझर लाँच, 'या' दिवशी होणार रिलीज)

शिल्पा शेट्टी हिने तिचे हे फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. तर शो मध्ये दाखल झाल्यानंतर शिल्पा शेट्टी भावूक झाल्याचे दिसून आली. तर गेल्या काही दिवसांपासून ती ज्या परिस्थितीतून जात आहे त्यामध्ये सुद्धा ती स्वत:सह परिवाराला नेहमीच धीर देत असल्याचे दिसून आले आहे.