'रात्रीस खेळ चाले 3' मध्ये 'शेवंता' परत येणार? पहिली झलक आली समोर
Shevanta in Ratris Khel Chale 3 (Photo Credits: Instagram)

'अण्णा नाईक परत येणार' या वाक्याने अवघ्या महाराष्ट्राला वेडं लावले आणि सर्वांची 'रात्रीस खेळ चाले 3' (Ratris Khel Chale 3) या मालिकेची उत्सुकता आणखीनच वाढवली. झी मराठीवरील या मालिकेचे प्रोमोने तर सर्वांना वेडं लावलच होतं. त्यानंतर या मालिकेत शेवंताही (Shevanta) परत येणार का? असा प्रश्न सर्व रसिक प्रेक्षकांना पडला होता. त्या प्रश्नाचे उत्तर 'शेवंता परत येणार' हे दाखवणारा एक प्रोमो नुकताच समोर आला आहे. या प्रोमोमध्ये शेवंताची भूमिका साकारणारी अपूर्वा नेमाळेकर (Apurva Nemalekar) हिचे घारे डोळे दिसत आहे.

गंमतीचा भाग म्हणून तुम्ही हा फोटो मोठा करुन (झूम) पाहिलात तर तुम्हाला दिसेल की त्या फोटोवर एप्रिल फूल असे लिहिले आहे. मात्र अनेकांची शेवंता परत येणार याची लोकांना खात्री पटली असल्याने तिच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता वाढली आहे. तर ज्यांना हे एप्रिल फूल असल्याचे लक्षात येता त्यांचा हिरमोड झाला आहे.हेदेखील वाचा- 'रात्रीस खेळ चाले 2’ मधील वच्छीचा 'नागिन डान्स' व्हायरल, तुम्ही पाहिलात का? (Watch Video)

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

तर दुसरीकडे शेवंता म्हणजेच अपूर्वाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन आपण मालिकेत परत येणार असल्याचे सांगितले आहे. इतकचं नाही तर मालिकेमध्ये शेवंताची एक झलकही चाहत्यांना पाहायला मिळाली आहे. पांडूला आरश्यामध्ये शेवंता दिसली आहे. त्यामुळे लवकरच येत्या भागात शेवंता प्रत्यक्ष भेटीला येणार आहे.

घराघरात पोहोचलेली झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'रात्रीस खेळ चाले 2' ने 29 ऑगस्ट 2020 रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेला आणि मालिकेतील कलाकारांना सर्व प्रेक्षक प्रचंड मिस करत होते. विशेषत: या मालिकेतील अण्णा नाईक (Anna Naik) आणि शेवंता (Shevanta) हे पात्रांना तर प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले. अण्णा नाईकांचा दरारा आणि शेवंताची मादक अदा पाहून या मालिकेचे चाहत्यांना भावली. त्यामुळे ही मालिका पुन्हा सुरु करा असे अनेक चाहते मागणी करत होते. त्याच दरम्यान आज झी मराठीवर 'रात्रीस खेळ चाले 3' (Ratris Khel Chale 3) या मालिकेचा टीजर समोर आला आहे.