Sushant Singh Rajput Death: सुशांत सिंह राजपूत च्या आत्महत्येने त्याची पडद्यावरील आई उषा नाडकर्णी यांना अश्रू झाले अनावर, दिली ही भावूक प्रतिक्रिया
Sushant Singh Rajput and His Pavitra Rishta Co-Actor Usha Nadkarni (Photo Credits: Facebook)

बालाजी टेलिफिल्म च्या 'पवित्र रिश्ता' (Pavitra Rishta)  या मालिकेतून 'मानव' या नावाने घराघरात पोहोचलेला सुप्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्येने सर्वांना धक्काच बसला. हा धक्का त्याच्या कुटूंबाला पचविणे जितके अवघड आहे तितकच त्याच्या चाहत्यांना आणि त्याच्यासोबत काम केलेल्या अनेक कलाकारांना. पवित्र रिश्ता या मालिकेतून सुशांतच्या आईची भूमिका करणा-या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) यांना देखील हा धक्का पचवता येत नाहीय. माझा अजूनही या गोष्टीवर विश्वास बसत नाहीय अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.

"सुशांत हा खूप हुशार, शांत आणि थोडा लाजाळू असा अभिनेता होता. जेव्हा माझ्या हेअर ड्रेसरने मला फोन करुन ही माहिती दिली तेव्हा माझा विश्वासच बसला. सुशांत आत्महत्या कशी करू शकतो हाच मला प्रश्न पडलाय. पण नंतर ही बातमी वा-याच्या वेगाने सोशल मिडियावर पसरू लागली तेव्हा माझ्या मनात अगदी धस्स झालं." अशी भावूक प्रतिक्रिया उषा नाडकर्णी यांनी दिली आहे.

हेदेखील वाचा- RIP Sushant Singh Rajput: WWE स्टार जॉन सीना याने सोशल मीडियात पोस्ट करत सुशांत सिंह राजपूत याला वाहिली श्रद्धांजली

"ही बातमी ऐकताच मी थरथर कापू लागली आणि मला रडू कोसळले. मी नि:शब्द झाले आहे. त्याच्या आत्म्यास शांती मिळो अशी मी देवा चरणी प्रार्थना करते. सुशांत हा सेटवर नेहमी शांत बसायचा आणि आपल्या कामाशी काम ठेवणारा एक चांगला मुलगा होता. तो कायम माझ्या स्मरणात राहिल" असेही उषा नाडकर्णी म्हणाल्या.

मालिकांसोबत बॉलिवूडमध्येही नाव कमावलेला हरहुन्नरी कलाकार सुशांत सिंह राजपूत यांनी रविवारी (14 जून) ला वांद्रयाच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण बॉलिवूडसह देश हळहळला.