Ashalata Wabgaonkar (Photo Credits: Instagram)

सोनी मराठी (Sony Marathi) वरील नवी मालिका आई माझी काळुबाई   (Aai Mazi Kalubai) च्या सातारा (Satara) येथील सेट वर शुटींंग दरम्यान 27 जणांंना कोरोनाची लागण (Coronavirus)  झाली आहे. यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर (Ashalata Wabgaonkar) यांंच्या सह अन्य क्रु मेंंबर्सचा समावेश आहे, सुदैवाने अन्य सर्वांंची प्रकृती सध्या स्थिर असुन ते उपचार घेत आहेत पण आशालता यांंच्या प्रकृतीत बराच बिघाड आल्याने त्यांंना सध्या व्हेंंटिलेटर वर ठेवण्यात आले आहे. दोन दिवसांंपुर्वी हा सगळा प्रकार घडला असुन आता मालिकेचं शुटींंग पुर्णपणे थांंबवण्यात आले आहे. या मालिकेत आशालता यांंच्यासोबतच अलका कुबल (Alka Kubal), प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad)  सुद्धा मुख्य भुमिकेत आहेत. अलका कुबल याच मालिकेच्या निर्मात्या सुद्धा आहेत. Singing Star टीम मधील स्पर्धक अभिजीत केळकर व पुर्णिमा डे सह एकुण 6 जणांंना कोरोनाची लागण

प्राप्त माहितीनुसार, काळु बाईच्या नावानं चांंगभलं मालिकेचे शुटींंग हे सातार्‍यात वाई जवळच्या एका फार्म हाउस वर सुरु आहे. अलिकडेच मालिकेत एका गाण्याच्या शुटींंग साठी मुंंबईवरुन एक डान्स ग्रुप इथे गेला होता या ग्रुप मुळेच व्हायरस पसरल्याची शक्यता मानली जातेय. दोन दिवसांपूर्वी आशालता यांंची प्रकृती बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

दरम्यान कोरोनाचा सुरु झाल्यापासुन जवळपास चार महिने शुटींंग बंंद होते ज्यानंंतर आता अनलॉक च्या नियमांंनुसार चित्रपट व मालिकांंच्या शुटींंगला परवानगी देण्यात आली आहे. यावेळी सुरुवातीला ज्येष्ठ कलाकारांंना सेट वर येण्याची परवानगी नव्हती मात्र हा ही नियम बदलुन सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली होती. यापुर्वी सिंंगिग स्टार मालिकेच्या सेट वर सुद्धा स्पर्धक तसेच क्रु मेंंबरना कोरोनाची लागण झाली होती.