Singing Star टीम मधील स्पर्धक अभिजीत केळकर व पुर्णिमा डे सह एकुण 6 जणांंना कोरोनाची लागण
Abhijeet Kelkar And Purnima Dey Found COVID 19 Positive (Photo Credits: Instagram)

सुबोध भावे (Subodh Bhave) नंंतर आता आणखीन काही मराठी कलाकारांंना कोरोनाची लागण झाल्याचे समजत आहे. बिग बॉस मराठी सीझन 2 (Bigg Boss Marathi 2) मधुन घराघरात पोहचलेला अभिजीत केळकर (Abhijeet Kelkar) आणि तुला पाहते रे (Tula Pahate Re) मालिकेत सोनिया साकारलेली अभिनेत्री पुर्णिमा डे (Purnima Dey) यांंचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अलिकडेच झी युवा वर सुरु झालेल्या सिंंगिंग स्टार (Singing Star) या सेलिब्रिटी रिअ‍ॅलिटी शो मध्ये अभिजीत व पुर्णिमा स्पर्धक म्हणुन सहभागी झाले आहेत.या शोच्या सेट वरच रोहित राउत (Rohit Raut) आणि जुईली जोगळेकर (Juilee Joglekar)यांंना सुद्धा कोरोनाची लागण झाली होती मात्र आता ते दोघेही बरे झाले आहेत. सेटवरील 2 क्रू मेंंबर्स सुद्धा कोरोनाबाधित आहेत असे समजतेय.परिणामी 10 सप्टेंबर पर्यंत शोचे शुटींंग बंद असणार आहे.

अभिजीत केळकरने आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती देत नुकतीच एक पोस्ट सुद्धा केली होती. "सर्व प्रकारची काळजी घेऊनही मला कोरोना ची लागण झाली. माझी फक्त पाठ दुखत होती ह्या व्यतिरिक्त मला आणखी काहीही होत नव्हतं किंवा सर्दी,खोकला, ताप अशी कुठलीही लक्षणही नव्हती. डॉक्टरांना विचारल्यावर त्यांनी टेस्ट करून घ्यायला सांगितली जी पॉझिटिव्ह आली व त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी व्यवस्थित ट्रीटमेंट घेत आहे आणि आता माझी तब्येत उत्तम आहे" असे अभिजीत ने या पोस्ट मध्ये सांंगितले आहे. तसेच अभिजीत ने पत्नी तृप्ती आणि मुलंं राधा व मल्हार ठणठणीत असल्याचे सुद्धा म्हंटले आहे.

अभिजीत केळकर Instagram Post

 

View this post on Instagram

 

...नमस्कार, सर्व प्रकारची काळजी घेऊनही मला कोरोना ची लागण झाली... माझी फक्त पाठ दुखत होती ह्या व्यतिरिक्त मला आणखी काहीही होत नव्हतं किंवा सर्दी,खोकला, ताप अशी कुठलीही लक्षणही नव्हती... डॉक्टरांना विचारल्यावर त्यांनी टेस्ट करून घ्यायला सांगितली जी पॉझिटिव्ह आली... त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी व्यवस्थित ट्रीटमेंट घेत आहे आणि आता माझी तब्येत उत्तम आहे... माझी बायको तृप्ती आणि राधा- मल्हार सगळे ठणठणीत आहेत... तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असेच कायम पाठीशी असू देत धन्यवाद...

A post shared by Abhi Kelkar (@abhijeetkelkarofficial) on

दरम्यान, कालच अभिनेता सुबोध भावे याला सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. सुबोध, पत्नी मंंजिरी व मुलगा कान्हा हे तिघेही कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती स्वतः सुबोधनेच ट्विट करुन दिली होती.