बिग बॉस फेम Shehnaaz Gill चे वडील Santokh Singh यांनी घेतली शपथ-'मुलीसोबत आयुष्यभर बोलणार नाही', जाणून घ्या कारण 
Shehnaaz Gill - Santokh Singh (Pic Credit- Instagram)

बिग बॉस 13 मुळे रातोरात स्टार झालेली शहनाज गिल (Shehnaaz Gill) सध्या सोशल मिडियावर चांगलीच लोकप्रिय आहे. सिद्धार्थ शुक्लासोबत असलेली तिची केमिस्ट्री चाहत्यांना चांगलीच भावली होती. बिग बॉस 13 च्या काळात शहनाजच्या वडिलांची ओळखही प्रेक्षकांना झाली होती. आता शहनाजचे वडील संतोख सिंह (Santokh Singh) तिच्यावर खूप चिडले आहेत. एका मुलाखती दरम्यान त्यांनी हा खुलासा केला. महत्वाचे म्हणजे ते शहनाजवर इतके रागावले आहेत की, त्यांनी शहनाजची आयुष्यभर न बोलण्याचा निर्णय घेतला आहे.

शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला अलीकडेच त्यांच्या नवीन गाण्याचे चित्रीकरण करण्यासाठी चंदीगडला दाखल झाले होते. शहनाझचे घर चंदीगडपासून अवघ्या 2 किमी अंतरावर आहे पण तरीही ती तिच्या पालकांना भेटायला गेली नव्हती. यावर शहनाजचे वडील संतोख सिंह खूप चिडले आहेत. Tellychakkar.com  शी बोलताना ते म्हणाले, ‘शहनाज चंदीगडमध्ये असल्याचे आम्हाला माध्यमांच्या वृत्तावरून कळले. चंदीगडपासून 2 किमी अंतरावर घर असूनही शहनाज आम्हाला भेटायला आली नाही याचे आम्हाला फार दुःख झाले आहे. आता मी तिच्याशी कधीही बोलणार नाही.‘

संतोखसिंह पुढे म्हणाले, ‘शहनाजच्या मॅनेजरचाही नंबर माझ्याकडे नाही जेणेकरुन मी शहनाजपर्यंत पोहोचू शकेन. मी आता शपथ घेतली आहे की, मी त्याच्याशी आयुष्यभर बोलणार नाही.’ संतोख सिंह यांनी दावा केला की, शहनाजने तिच्या घरी येण्यास नकार दिला आहे आणि असेही सांगितले आहे की सध्या ती तिच्या कामत बिझी आहे. (हेही वाचा: Bigg Boss 14 चा स्पर्धक राहुल वैद्य बिग बॉसच्या घरातून Disha Parmar ला नॅशनल टेलिव्हिजन वर घालणार लग्नाची मागणी)

दरम्यान, नुकतेच काही खोडकर लोकांनी शहनाज गिलच्या बियास घराच्या बाहेर वादग्रस्त पोस्टर्स लावले होते. या संदर्भात शहनाजचे वडील संतोख सिंह यांनी पोलिस स्टेशन बियास येथे तक्रार केली असता पोलिसांनी त्यांनाच तीन तास पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. या पोस्टरमुळेच शहनाज गिल आपल्या घरी येण्यासाठी घाबरत असल्याची माहिती मिळत आहे.