'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेच्या प्रोडक्शन कंट्रोलरच्या विरोधात FIR दाखल, शारिरक संबंधाची मागणी केल्याचा स्वाती भादवे हिचा आरोप
(Image Courtesy: Archived, Edited, Symbolic Image)

प्रसिद्ध मराठी मालिका 'सहकुटुंब सहपरिवार' (Sahkutumb Sahaparivar) ही गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडत चालली आहे. यापूर्वी मालिकेतील अभिनेत्री अन्नपूर्ण विठ्ठल यांनी शो चे कलाकार आणि डायरेक्टर यांच्यावर मानसिक त्रास देण्यासह आत्महत्या करण्यास उकसवण्याचा आरोप केला होता. अशातच आता मालिकेती दुसरी अभिनेत्री हिने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

शो मधील अभिनेत्री स्वाती भादवे हिने प्रोडक्शन कंट्रोलर स्वप्निल लोखंडे याच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. स्वाती हिने असे म्हटले की, स्वप्निल याने माझा नंबर मागितला. त्यानंतर मी पुण्याला काम करशील का की नाही असे विचारले. तेव्हा मी कुठून ही काम करु शकते असे स्वाती हिने त्याला म्हटले.(स्टार प्रवाहवरील 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेतील अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल यांनी दिग्दर्शक, कलाकारांच्या विरोधात केले आरोप; सुनिल बर्वे यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया)

स्वाती हिने पुढे म्हटले की, त्यानंतर त्याने म्हटले जे त्याला हवे ते मी देऊ शकते. मी त्यांना कमिशन देईन असे म्हटले. परंतु त्याचा बोलण्याचा अर्थ वेगळा असून त्याने भलतेच म्हटले. त्याला माझ्यासोबत लैंगिक संबंध ठेवायचे असून त्यानंतर तो मला काम देऊ करेल असे त्याने म्हटले. परंतु हे सर्व ऐकल्यानंतर धक्का बसल्याचे स्वाती हिने सांगितले.

दरम्यान, स्वप्निल याच्या विरोधात गोरेगाव पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.  असे सांगितले जात आहे की, स्वाती हिने यापूर्वी सुद्धा  मराठी टेलिव्हिजनवरील विविध मालिकांमध्ये काम केले आहे.