स्टार प्रवाहवरील 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेतील अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल यांनी  दिग्दर्शक, कलाकारांच्या विरोधात अनेक आरोप केले आहे. त्यासंबंधित त्यांनी एक व्हिडिओ सुद्धा शेअर केला आहे. तर मालिकेत अन्नपूर्णा यांनी आईची भुमिका सााकारली होती. तर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओत त्यांनी असे म्हटले की, मला मराठी येत नसल्याने मला त्रास दिला गेला. त्यामुळेच मालिका सोडावी लागली. ऐवढेच नव्हे तर मालिका सोडल्यानंतर मालिकेतून काढल्याची चर्चा पसरवण्यात आली. यासह त्यांनी अजून काही आरोप ही केले आहेत.

Video:

अन्नपूर्णा विठ्ठल यांनी केलेल्या आरोपानंतर आता अभिनेता सुनील बर्वे याने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने असे म्हटले की, मी अनेक वर्षांपासून या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. परंतु माझ्या सोबत असे कधीच झाले नाही.  आमच्याबद्दल अशा प्रकारच्या गोष्टी करत सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न का करत आहात? हेच कळत नाही आहे. मालिका सोडणे ही त्यांची निवड होती. परंतु त्यांच्या जाण्याने आम्हाला सुद्धा वाईट वाटले. मात्र त्यांनी केलेल्या प्रकाराबद्दल काहीच माहिती नसल्याचे बर्वे याने म्हटले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)