कोरोना काळात Rohit Shetty ची मोठी मदत; कोविड सेंटरसाठी दान केले 250 बेड्स
Rohit Shetty (Photo Credit: Instagram)

भारतामध्ये सध्या कोविड-19 (Coronavirus) महामारीने हाहाकार माजवला आहे. दररोज लाखोंच्या घरात कोरोनाची प्रकरणे समोर येत आहेत. अनेक बॉलिवूड सेलेब्स या कठीण काळात मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. मागच्या वर्षीच्या लॉकडाउनमध्ये निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टीने (Rohit Shetty) खूप मदत केली होती आणि आता पुन्हा रोहित मदतीसाठी पुढे आला आहे. यावेळी त्याने दिल्लीला मदतीचा हात दिला आहे. रोहितने दिल्लीतील गुरु तेज बहादूर कोविड केंद्रासाठी 250 रुग्णालयाचे बेड दान केले आहेत. या व्यतिरिक्त रोहित इतरही अनेक वैद्यकीय सुविधांबाबत मदत करत आहे.

नेते मनजिंदरसिंह सिरसा यांनी रोहितचे कौतुक करत ट्विट केले आहे. ते म्हणतात, ‘भलेही रोहित ऑन-स्क्रीन ‘खतरों के खिलाड़ी’ असू शकतो, परंतु पडद्यामागे तो खूप संवेदनशील आहे, जो माणुसकीची काळजी करतो. आमच्या कोविड केअर सुविधेसाठी मदत केल्याबद्दल रोहित शेट्टी यांचे आभार. आपल्या सपोर्टबद्दल आम्ही आभारी आहोत तुमच्या या मदतीबदल्यात तुम्हाला अनेक आशीर्वाद प्राप्त होतील.’

रोहित शेट्टी याने नक्की किती आणि काय मदत केली याबद्दल सिरसा यांनी माहिती दिली नाही. पण रोहित शेट्टीने कोविड केअरमध्ये 250 बेड्स विनामूल्य दिले असल्याचे छायाचित्रकार व्हायरल भियानी यांनी आपल्या पोस्टद्वारे सांगितले आहे. (हेही वाचा: Virat Kohli-Anushka Sharma च्या कोरोना विरुद्धच्या लढ्याला मिळाले मोठे यश, 24 तासांच्या आत जमा झाले 3.6 कोटी रुपये)

दरम्यान, काही दिवसांपूर्वी रोहितला कोविड काळामध्ये मुंबई पोलिसांना मदत केल्याबद्दल एक पुरस्कार देण्यात आला होता. रोहित शेट्टीने मुंबई पोलिसांसाठी राहणे व खाण्यासाठी 8 हॉटेलची व्यवस्था केली आहे. तसेच त्याने दररोज काम करणार्‍या मजुरांना 51 लाख रुपये दिले आहेत. दरम्यान, रोहितच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर, आता तो लवकरच खतरों के खिलाडी 11 या शोमध्ये दिसणार आहे. या कार्यक्रमासाठी सर्व सेलेब्स केपटाऊनमध्ये पोहोचले आहेत.