
लॉकडाऊनमुळे गेले 3 महिने सर्व मालिकांचे, सिनेमांचे शूटिंग बंद ठेवण्यात आले होते. आत अनलॉक 1 च्या टप्प्यात हळूहळू चित्रिकरणास सुरुवात होत आहे. मात्र गेले 3 महिने आपल्या आवडत्या मालिका, आवडते कलाकार न दिसल्यामुळे प्रेक्षकवर्ग खूप नाराज आहे. त्यात झी मराठीवरील 'रात्रीस खेळ चाले-2' (Ratris Khel Chale-2) या मालिकेतील शेवंता (Shevanta) हे पात्र साकारणारी अपूर्वा नेमळेकर हिला (Apurva Nemlekar) तिचे चाहते प्रचंड मिस करतायत. त्यामुळे लॉकडाऊनच्या दिवसात अपूर्वा आपल्या चाहत्यांसोबत सोशल मिडियाद्वारे संवाद साधत आहे. तसेच आपले फोटोज, व्हिडिओज शेअर करत आहे. मात्र नुकताच तिने आपला ग्लॅमरस अंदाजातील फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून तिचे चाहते हैराण झाले असून आपल्या लाडक्या शेवंतावर सुंदर चारोळ्या रचून त्यांनी तिचे कौतुक केले आहे.
या फोटोमध्ये अपूर्वा ने निळ्या रंगाचे वेस्टर्न आऊटफिट्स घातले असून यात ती खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. हे पाहून चाहतेही घायाळ झाले असून तिचे तोंडभरून कौतुक करण्यासाठी मजेशीर चारोळ्या तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील कमेंट्स बॉक्समध्ये लिहिल्या आहेत.
हेदेखील वाचा- रात्रीस खेळ चाले 2 फेम शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर येणार नव्या रूपात; पाहा इब्लिस नाटकातील तिचा लुक
पाहा फोटोज:

'फळ्या फळा लाकडाचा फळा, शेवन्ता बाई कापताय भेदक नजरेनं लोकांचा गळा' पासून ते 'गरम गरम भजी खाऊन जीभ माजी भाजली शेवंता बाई चा फोटो बगून न्यानंदा पण लाजली' अशा मजेशीर चारोळ्या तयार केल्या आहेत.
लॉकडाऊनमध्ये अपूर्वाने आपले अनेक रेसिपीजचे व्हिडिओ पण शेअर केले होते. अपूर्वाही सोशल मिडियावर बरीच सक्रिय असते. त्यामुळे तिच्या या ग्लॅमरस फोटोला कमेंट्सचा वर्षाव होणार नाही असं होणारच नाही.