रात्रीस खेळ चाले 2 फेम शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर येणार नव्या रूपात; पाहा इब्लिस नाटकातील तिचा लुक
Apurva Nemlekar (Photo Credits: Instagram)

झी मराठी (Zee Marathi) वरील रात्रीस खेळ चाले ही भयकथेवर आधारित मालिका इतकी गाजली की प्रेक्षकांच्या आग्रहापोटी या मालिकेचा सीझन 2 (Ratris Khel Chale 2) देखील तयार करण्यात आला. परंतु, इतर मालिकांप्रमाणे या मालिकेच्या कथानकाचा सीक्वेल न येता, या कथेचा प्रीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस आला. मुख्य म्हणजे मालिकेतील अण्णा आणि शेवंता ही दोन पात्र आणि त्यांच्यातील केमिस्ट्री विशेष गाजली.

शेवंताने आपल्या अदाकारीने प्रेक्षकांची मनं जिंकली. आणि आता शेवंता (Shevanta from Ratris Khel Chale 2) फॅन्स साठी एक आनंदाची बातमी आहे. शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) लवकरच एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु, यावेळी टेलिव्हिजन स्क्रीनवर नाही तर रंगभूमीवरून. अपूर्वा 'इब्लिस' हे नवं मराठी नाटक करत आहे. या नाटकाचं कथानक नेमकं काय असणार या बद्दल काहीही सांगण्यात आलं नसलं तरी त्याचा पोस्टर मात्र नुकताच लाँच करण्यात आला.

 

View this post on Instagram

 

चरणी वाहिले लोकाश्रयी, शृंगार मदना सुमन पहिले श्रद्धेचे वाहिले, नाव 'शेवंता' प्रेमालयात होती तेंव्हा, प्रसन्न रंगदेवता! तीस नमन करून 'जुई' नामे दुसरे सुमन,  चरणी वाहत आहे जन्म-मरण, राग यमना. अनेक वर्षे अनेक पुष्पे, वाहिन त्याच श्रद्धे, करते आवाहन आधी सेवा ही कबुला. आस प्रेमाची, विश्वास माझा, तुमच्या श्रद्धेला. धुंद आसमंत जेंव्हा होईल त्या घटकेला, कराल पुन्हा अमाप गर्दी 'इब्लिस' या नाट-काला… *लेखक- दिगदर्शक:  मिलिंद शिंत्रे  नेपथ्य:  संदेश बेंद्रे संगीत: राहुल रानडे प्रकाश योजना: शितल तळपदे वेशभूषा : महेश शेरला* *कलाकार / पात्र परिचय:  राहुल मेहंदळे, सुनील देव,  अपूर्वा नेमळेकर उर्फ 'जुई', आणि वैभव मांगले* *शुभारंभाचा प्रयोग*  दिनांक २१ डिसेंम्बर २०१९ वेळ रात्री ८.३०  वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह आणि लवकरच तुमच्या जवळच्या नाट्यगृहात  शब्दांकन  मंगेश साळवी . #apurvanemlekar #newbeginnings #newnatak #Iblis #Iblisthenatak #jui #zeemarathi Thank you @zeemarathiofficial 🙏

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial) on

अपूर्वा ने या नाटकाचा पोस्टर आपल्या सोशल मीडिया हॅण्डल्सवर शेअर केला आहे. या नाटकात तिचे 'जुई' असे नाव असणार आहे तर 'शैतान हाजिर' अशी या नाटकाची टॅगलाईन आहे.

राम गणेश गडकरी लिखीत 'एकच प्याला' नाटक पुन्हा एकदा नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला 

'इब्लिस' या नाटकात, अपूर्वा सोबत अभिनेते वैभव मांगले हे प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत. तसेच राहुल मेहेंदळे व सुनील देव हे कलाकार देखील महत्त्वाच्या भुमीका साकारणार आहेत.