रश्मी देसाईसाठी पूजा (संग्रहित संपादित प्रतिमा)

बिग बॉस 13 च्या फिनालेची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी या वेळी विजेता कोण असणार याची चर्चा अधिक रंगत चालली आहे. यावेळीच्या सर्वात तगड्या सेलेब्जमध्ये सिद्धार्थ, आसीम, शेहानाज, पारस आणि रश्मी देसाई यांचे नाव आहे. रश्मी देसाई हे छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय नाव. तिचे चाहते आणि फॉलोअर्सची संख्याही मोठी आहे. अशात रश्मीचे कुटुंबीयही ती वजेता व्हावी यासाठी देवाला नवस मागत आहेत. नुकतेच रश्मीच्या टीमने एका पूजेचे आयोजन करत तिच्या विजयासाठी साकडे घातले. या पूजेमध्ये रश्मीचे कुटुंबीयही सहभागी झाले होते.

ही पूजा, पिनेकल सेलिब्रिटी मॅनेजमेंटच्या ऑफिसमध्ये घातली गेली. रश्मीचे निकटवर्तीय आणि कंपनीचे मालक संतोष गुप्ता यांनी 'सुंदरकांड पाठाचे' आयोजन केले होते. या पूजेमध्ये रश्मीचा मानलेला भाऊ गौरव देसाई देखील उपस्थित होता.  याशिवाय रश्मीची वाहिनी रूपल देसाईदेखील या पूजेमध्ये सामील झाली होती. शोच्या फॅमिली वीक टास्कमध्ये रूपल देसाई तिची मुले, स्वस्तिक आणि भाव्यासमवेत बिग बॉसमध्ये आली होती. रूपल देसाई रश्मीचा खरा भाऊ बुलंद देसाई यांची पत्नी आहे. (हेही वाचा: Bigg Boss 13: सलमान खानने नकळत रिव्हिल केले विजेत्याचे नाव?)

दरम्यान, छोट्या पडद्यावरील एक वादग्रस्त शो अशी ओळख असलेल्या, बिग बॉसचे हे 13 वे पर्व चालू आहे. सध्या शो त्याच्या अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. या शोमध्ये सदस्यांना सपोर्ट करण्यासाठी त्यांचे मित्र आणि कुटुंबीय घरात आले आहेत. रश्मी देसाईचा खेळ मजबूत करण्यासाठी तिची जिवलग मित्र देवोलीना भट्टाचार्यजी घरात आली आहे. आता नक्की कोण वीजता ठरते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.